beautiful Photos and videos of Shivneri are going viral 
पुणे

शिवनेरीवर भगव्या रंगाचा साज ! फोटो, व्हिडीओ होत आहेत व्हायरल

सिध्दार्थ कसबे

पिंपळवंडी : जुन्नर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे  वातावरणात एक बदल घडून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या किल्ल्यावर रविवारी( ता.६) संध्याकाळी आकाशात दाटलेल्या भगव्या रंगाने एक साज चढवला. त्याच प्रमाणे आकाशात उडणारे पक्षी व आकाशाचा हा भगवा रंग मन आनंदीत करणारा होता.

पुण्यात रुग्ण फिरला तीन तास अन् उपचार पिंपरीत 

तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी सायंकाळी आकाश भगव्या व गुलाबी रंगाने रंगुन निघाले होते. यामुळे शिवनेरी किल्ल्याला एक वेगळीच झळाळी आली. किल्ला व परिसरात या वातावरणामुळे एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.. प्रत्येक जण हे दृश्य पाहताच स्तब्ध झाला होता अनेकांनी हा सुंदर नजारा आपल्या डोळ्यांत त्याचप्रमाणे आपापल्या कॅमेऱ्यात कैद केला व सर्वांनी आपल्या व्हाट्सऍप, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर या नयनरम्य दृश्याचे फोटो व व्हिडीओ ठेवले. सध्या तालुक्यात दोन दिवस हेच चित्र आपल्याला सगळीकडे पहायला मिळत आहे.

बाउन्सरचा 'डोस'; रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत

कोरोनामुळे सध्या सगळीकडेच एक उदासनेतेच वातावरण आहे त्यात हे दृश्य लोकांना दिसल्याने लोकांची मने प्रफुल्लित झाली असुन निसर्गही आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे याचा प्रत्यय सर्वांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Latest Marathi News Update : गडचिरोलीत ST बस उलटली; 25 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT