st.jpg 
पुणे

'या' अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

सकाळवृत्तसेवा

पुणे : विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या एम.एस.सी. इन फार्मास्युटिकल मेडिसिन, हेल्थ केअर अॅडमिनीस्ट्रेशन व मास्टर्स ऑफ पब्लिक हेल्थ (न्युट्रिशन) पद्व्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी ( सन २०२०-२१) प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २२जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. 

वैद्यकीय क्षेत्रातील करीअर तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नाविण्यपुर्ण संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध निर्मिती क्षेत्रातील नाविण्यपुर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर म्हणाले, "विद्यापीठाच्या मास्टर इन पब्लिक हेल्थ न्युट्रिशन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना पोषणविषयक विशिष्ट कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि करण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे ज्ञान मिळत असल्याने हा अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरीता अत्यंत महत्वपूर्ण आहे." तर एमबीए इन हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना हॉस्पिटल व्यवस्थापन, हॉस्पिटल सेवेचे सुयोग्य नियोजन, रुग्ण सेवेबाबत व्यवस्थापन आदी सर्व व्यवस्थापकीय कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येते, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी नमूद केले. 

'कोविड-19' आजाराचा प्रादुर्भाव पाहता विद्यापीठाने इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २२जुलै पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या अभ्यासक्रमाकरीता घेण्यात येणाऱ्या केंद्रिय सामायिक परीक्षेबाबतची माहिती लवकरच विद्यापीठाचे ' www.muhs.ac.in' या संकेतस्थळ देण्यात येणार आहे, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्ट

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT