लोणी काळभोर (ता. हवेली) - रायवाडी परिसरात बेबी कालव्यातील जलपर्णी, गवत व इतर अडथळे जेसीबी यंत्राच्या साह्याने काढताना पाटबंधारे खात्याची यंत्रणा.
लोणी काळभोर (ता. हवेली) - रायवाडी परिसरात बेबी कालव्यातील जलपर्णी, गवत व इतर अडथळे जेसीबी यंत्राच्या साह्याने काढताना पाटबंधारे खात्याची यंत्रणा. 
पुणे

बेबी कालव्यातील अडथळे काढण्यास सुरवात

सकाळवृत्तसेवा

उरुळी कांचन - बेबी कालव्यातील जलपर्णी, गवत व इतर अडथळे जेसीबी यंत्राच्या साह्याने काढण्यास सुरवात करून खडकवासला पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना बुधवारी (ता. ३) सकाळी सुखद धक्का दिला.

खडकवासला पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी मंगळवारी (ता. २) पुढील दोन दिवसांत यंत्राच्या साह्याने जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, अवघ्या २४ तासांच्या आत काम सुरू करून लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीतील बेबी कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. 

हवेली व दौंड तालुक्‍यांतील शेतीसाठी पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील शुद्ध केलेले सांडपाणी मुंढवा जॅकवेलच्या मदतीने बेबी कालव्यात सोडले जात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून कालव्यात क्षमतेपेक्षा जादा पाणी सोडण्यास सुरवात केली.

त्यामुळे कालवा अनेक ठिकाणी फुटण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातच कालव्यात जलपर्णी, इतर गवत मोठ्या प्रमाणात उगवल्याने कालव्याची गळती मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे कालव्यालगतच्या शेतांना तळ्याचे रूप आले होते. ही बाब ‘सकाळ’ने उचलून धरली. त्यामुळे कालव्यातील पाणी कमी करण्याबरोबरच लोणी काळभोर-रायवाडी परिसरापासून कालव्यातील अडथळे काढण्याचे कामही पाटबंधारे विभागाने सुरू केले आहेत. 

जलपर्णी, गवत व इतर अडथळे जेसीबी यंत्राच्या साह्याने काढण्यास सुरवात केली, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. या प्रश्‍नाचा पाठपुरावा ‘सकाळ’ने केला. त्यामुळे हा प्रश्‍न ऐरणीवर आला व सुटला आहे. याबद्दल ‘सकाळ’चे धन्यवाद. मात्र, पाटबंधारे खात्याने केवळ कालव्यातील अडथळे काढण्यावर गप्प न राहता रायवाडी, कुंजीरवाडी (आळंदी म्हातोबाची येथे जाणारा रस्ता), उरुळी कांचन- पांढरस्थळा अशा अनेक ठिकाणी कालव्यावरून जाण्यासाठी जे रस्ते तयार केले आहेत, त्या खालील पाइप मोठ्या आकाराचे टाकण्याची गरज आहे. 
 - प्रशांत काळभोर, माजी अध्यक्ष, हवेली तालुका खरेदी-विक्री संघ    

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाटबंधारे विभागाने रायवाडीपासून जेसीबीच्या साह्याने जलपर्णी व कालव्यातील इतर गवत अडथळे काढण्याचे काम सुरू केले आहे. फुरसुंगी ते बोरी ऐंदीपर्यंत कालव्यात कृत्रिम अडथळे निर्माण झाले आहेत. खासगी जेसीबीच्या मदतीने अडथळे काढण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पाण्याची गळती थांबण्याची शक्‍यता आहे. तसेच, पाण्याची पातळी वाढवल्यासही पाणी वाहण्यास अडथळे निर्माण होणार नाहीत. त्यामुळे कालवा फुटण्याची भीतीही राहणार नाही. या पुढील काळात शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी पाटबंधारे विभाग नक्की घेईल. 
 - पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT