pune sakal
पुणे

Pune : डिंभे धरण परिसरातील बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत ४०० स्पर्धकांचा सहभाग

डेक्कन स्पोर्ट्स क्लब पुणे यांच्या वतीने डिंभे धरण (ता आंबेगाव) परिसरात आयोजित केलेल्या बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धेचा शुभारंभ

चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव

डेक्कन स्पोर्ट्स क्लब पुणे यांच्या वतीने डिंभे धरण (ता आंबेगाव) परिसरात आयोजित केलेल्या बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धेचा शुभारंभ राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता करण्यात आला. या स्पर्धेत देश विदेशातील सुमारे ४०० स्पर्धक स्विमिंग,सायकलिंग व रनिंग या प्रकारात सहभागी झाले आहेत. सहभागी स्पर्धकास या स्पर्धा पूर्ण कराव्या लागणार आहेत.

डेक्कन स्पोर्ट्स क्लब पुणे यांच्या वतीने डिंभे धरण परिसरात आयोजित बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावापासून सूरु होणारी ही स्पर्धा आडीवरे गावापर्यंत ते पुन्हा फुलवडे अशा मार्गाने होत असून या स्पर्धेत १६ वर्षांपासून ३० वर्षे, ३१ वर्ष ते ४० वर्षे, ४१ वर्षे ते ५० वर्षे आणि ५१ वर्षा पुढील एकूण ४०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्यक स्पर्धकाला १.९ किलोमीटर स्विमिंग ,९० किलोमीटर सायकलिंग व २१.१ किलोमीटर रनिंग अशी स्पर्धा पूर्ण करावी लागणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान एक वर्षे आधी नोंदणी करावी लागत असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. सहभागी स्पर्धकांना टाईम ई चिप,टी. शर्ट,गुडी बॅग किट, फीनीशर मेडल,सर्टिफिकेट दिले जाणार आहे.

यावेळी वळसे पाटील म्हणाले, ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. आंबेगाव तालुक्यात ही स्पर्धा घेतल्याने युवकांना स्पर्धेबाबत आकर्षण वाढेल. आंबेगावचा नावलौकिक वाढेल. स्पर्धेची नोंदणी एक वर्ष अगोदर होत असल्याने आपल्या परिसरातील युवकांनी सुद्धा यात सहभागी होण्यासाठी जागृत होणे गरजेचे आहे.

या स्पर्धेसाठी एकूण १५० व्हॅालेंटीयर्स स्पर्धा मार्गावर कार्यरत असून स्पर्धा मार्गावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे उदय पाटील,वैभव बेळगावकर,राजीव लिंग्रस,जयेश कदम,मनीष सूर्यवंशी,डॅा.समीर नागटीळक, समीर चौगुले,अमर धामणे,अतुल पोवार,संजय चव्हाण हे पदाधिकारी तसेच माजी पुणे जिल्हा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संतोष बोऱ्हाडे, दिलीपराव बोऱ्हाडे, गणेश बोऱ्हाडे, दिनेश खेडकर, मंगेश गाडे या स्पर्धेचे संयोजन करीत आहे. यावेळी जयसिंगराव काळे, प्रदीप अमोडकर नंदकुमार सोनावले, संजय गवारी उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात सध्या विविध कार्यक्रमाला वळसे पाटील उपस्थित राहतात. या कार्यक्रमाला ते पहाटे सहा वाजता उद्घाटन स्थळी पोहोचले. सध्या तेही वेळेत येऊन अजित पवारांचा कित्ता गिरवताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Viral Video: मुसळधार पावसातही लोकल सुस्साट, पश्चिम रेल्वेने शेअर केला व्हिडिओ; लोक म्हणाले- हेच मुंबईचे स्पिरिट !

Asia Cup 2025 आधीच इशान किशनला धक्का! टीम इंडियात निवड होणं झालं आणखी कठीण

Mumbai Heavy Rain : अंधेरीत ४ फूट पाणी, सबवे ३ तासांपासून बंद; गटाराचं झाकण तुटलं, पावसाने नागरिकांचे हाल

Dmart Thefts: खरेदी कमी, चोरी जास्त, डीमार्टमध्ये सर्वात जास्त चोरी कोणत्या वस्तूंची होते?

Video: 'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटने पुन्हा दिला 'तो' सीन; अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT