Bhagwan Buddha
Bhagwan Buddha 
पुणे

भगवान बुद्धांचे उलगडणार अंतरंग

सकाळवृत्तसेवा

पुणे - भौतिक सुखसाधनांची रेलचेल असूनही शांतता नसण्याच्या आजच्या काळाला सामोरे जाण्यासाठी सरश्रींसारखे आध्यात्मिक गुरू समाजाला मार्गदर्शन करत असतात. भारतीय आध्यात्मिक परंपरेची आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून आजच्या काळाच्या भाषेत पुनर्मांडणी करणे हे सरश्रींचे बलस्थान आहे. त्यांची विचारप्रवर्तक प्रवचने आणि पुस्तके असंख्य लोकांच्या जीवनाला दिशा देणारी ठरली आहेत.

येत्या रविवारी (ता. २२) सरश्रींचे भगवान बुद्धांचे विचार समजावून सांगणारे ‘बोझ नहीं, बोध के फॅन बनो ः अज्ञात की रुहानी हवा’ हे प्रवचन होत आहे. तेजज्ञान फाउंडेशनच्या सणसनगर, नांदोशी गाव, किरकटवाडी फाटा येथील मनन आश्रमात दुपारी १ ते ४ दरम्यान हे प्रवचन होणार आहे. 

याच कार्यक्रमात ‘सकाळ प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेल्या ‘भगवान बुद्ध जीवनचरित्र आणि निर्वाण अवस्था’ या सरश्री यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. राजकुमार सिद्धार्थ साधक गौतम कसे झाले, गौतमाला बोधप्राप्ती होऊन ते भगवान बुद्ध कसे झाले आणि बोधप्राप्तीनंतर त्यांनी काय केले, तसेच बौद्ध मूलतत्त्वे कोणती आणि आजही ती प्रस्तुत कशी आहेत, याची मांडणी सरश्री यांनी या पुस्तकात केली आहे. 

‘सकाळ प्रकाशन’ने या आधी सरश्री यांची ‘अंतर्मनाच्या शक्तीपलीकडील आत्मबळ’, ‘रामायण - वनवास रहस्य’, ‘संत ज्ञानेश्‍वर - समाधी रहस्य आणि जीवनचरित्र’, ‘स्वामी विवेकानंद - भारतातील गुरू - शिष्य परंपरेची मशाल’, ‘सदगुरू नानक - साधना रहस्य आणि जीवनचरित्र’, ‘भगवान महावीर - मनावर विजय प्राप्त करण्याचा मार्ग’ आणि ‘तुकाराम महाराज - अभंग रहस्य आणि जीवनचरित्र’ आदी पुस्तके प्रकाशित केली आहेत.

आपल्या आध्यात्मिक परंपरेची मदत घेऊन आजच्या काळाच्या आव्हानांना सामोरे कसे जाता येईल, हे दाखवणाऱ्या या मार्गदर्शनपर पुस्तकांना वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे.

पुस्तके राज्यभर उपलब्ध
सकाळ प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके सकाळ मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये व महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेते यांच्याकडे उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीसाठी कृपया www.sakalpublications.com किंवा amazon.in वर लॉग-इन करावे. 
अधिक माहितीसाठी संपर्क - ८८८८८४९०५९ (कार्यालयीन वेळेत).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT