पुणे

परितेच्या श्री भैरवनाथ केसरीचा जयदिप पाटील मानकरी: बुलेट मोटारसायकल सह चांदीची गदा बक्षीस; यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा, कुस्ती प्रेयसीची गर्दी

CD

PPN26B01151
परिते (ता. माढा) : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला जयदीप पाटील.

परितेच्या श्री भैरवनाथ केसरीचा जयदीप पाटील मानकरी
......
यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन; बुलेटसह चांदीची गदा बक्षीस
..........
सकाळ वृत्तसेवा
पिंपळनेर, ता. ४ : परिते (ता. माढा) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जयदीप पाटील याने प्रथम क्रमांकाची बुलेट अन् चांदीची गदा पटकावली. प्रतिस्पर्धी पंढरपूर येथील पैलवान रविराज चव्हाणला काही मिनिटांत चितपट करीत श्री भैरवनाथ केसरी-२०२६ कुस्तीचे मैदान मारले.
साखळी पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी यात्रा कमिटीच्या वतीने बुलेट मोटरसायकल व कै. रंगनाथ अण्णा पाटील यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच पिंटू पाटील यांच्या वतीने चांदीची गदा बक्षीस ठेवण्यात आले होती.
सुरवातीपासूनच जयदीपने आक्रमकपणे खेळ करीत सहाव्या फेरीनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यात दहा मिनिटांत रविराजला चितपट करीत जयदीपने विजेतेपदाला गवसणी घातली. रविराज चव्हाणला उपविजेतेपदावर (स्प्लेंडर गाडी) समाधान मानावे लागले. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी तात्या धुमाळे (पंढरपूर) व टाकळी (टें) येथील विश्वचरण सोलंकर टाकळी(गंगावेश तालीम कोल्हापूर) यांच्यात लढत झाली. यात खेळताना तात्या धुमाळेचा स्नायू दुखावल्याने त्याने माघार घेतल्याने तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी (५१ हजार रुपये) विश्वचरण सोलंकर यास विजय घोषित केले. चौथ्या क्रमांकावर (३१ हजार रुपये) तात्या धुमाळेला समाधान मानावे लागले. तर पाचव्या क्रमांकासाठी सुनील करवते (सांगली) व सौरभ मुसळे (परिते) यांच्यात झालेल्या लढतीत सौरभ मुसळे ने सुनीलवर मात करीत पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपयाचे बक्षीस मिळवले.
दुपारी यात्रा कमिटीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात येऊन कुस्ती प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. साखळी स्पर्धेतील प्रमुख लढतीसाठी वस्ताद अस्लम काझी यांनी पंच म्हणून काम पाहिले.

तब्बल सात तास लक्षवेधी लढती
यावेळी शंभर रुपये इनामापासून दोन हजार रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या. हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत सुमारे सात तास नामवंत मल्लांच्या लक्षवेधी लढती घेण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashwantrao Chavan Open University : मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात राडा! 'आम्ही फक्त टाळ्या वाजवायला आलोय का?' पदवीधरांचा संताप

भारतात पहिल्यांदाच Redmi Note 15 Pro+ अन् Redmi Note 15 Pro ची विक्री सुरू; सेलमध्ये बंपर डिस्काउंट ऑफर्स, पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : म्हाडाच्या अंधेरीतील पीएमजीपी कॉलनीत छत कोसळले; एक जण जखमी

Viral Video: लिफ्टमध्ये हायड्रोजन फुगे घेऊन शिरताच भनायक स्फोट, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

SCROLL FOR NEXT