Bhama Askhed
Bhama Askhed 
पुणे

"पुणेकरांना भामा-आसखेडचे पाणी देण्यास भाजप कटिबद्ध"

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २१ : राज्यात भाजपप्रणित महायुतीची सत्ता असतानाच्या काळात   भामा-आसखेड पाणी प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे पाणी पुणेकरांना  देण्यास भाजप कटिबद्ध असल्याचे  भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पत्रकात म्हटले आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत वादामुळे ही योजना पूर्ण होण्यास विलंब होत आहे. गेल्या वर्षभरात उर्वरीत ५ टक्के काम करण्यासही सरकारला अपयश आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

मुळीक म्हणाले, "राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी नुकतेच पुणे आणि पिंपरीला भामा-आसखेडचे पाणी देणार नाही, असे वक्तव्य केले आहे. मुळात या योजनेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात एकवाक्यता नाही. स्थानिक आमदार केवळ बैठका घेण्याचा फार्स करत आहेत. प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत.
आत्तापर्यंत पुणे-नगर रस्त्यावरील नागरिकांना भामा-आसखेडचे पाणी मिळाले असते. परंतु नियोजनाचा अभाव आणि स्थानिक आमदारांच्या राजकीय उदासिनतेमुळे प्रकल्प पूर्ण करण्यात अपयश आले आहे."

पुणे शहरांतील वडगावशेरी, चंदननगर, कळस, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा या शहराच्या पूर्व भागातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी मागील  सात वर्षांपासून भामा-आसखेडचे योजनेचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे ४१८ कोटी रुपयांचा खर्च येत आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर योजनेला आवश्यक असणारा महापालिकेच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT