Bharat band Ankush Kakade angry on shop traders Stand farmer protest 
पुणे

 Bharat bandh : अंकुश काकडे यांची व्यापाऱ्यांना धमकी वजा इशारा; म्हणाले...

सकाळवृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची हाक दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये व्यापारी संघटनांनी देखील सहभागी व्हावं असे आवाहन बंदमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांकडून करण्यात आलं होते.

पुण्यातील व्यापारी संघटनांनी सुरुवातीला या बंदमध्ये सहभागी होण्याचं नाकारले आणि दुकानं सुरूच राहतील असा निर्णय घेतला. मात्र, आंदोलकांचा मोर्चा पुण्यातील अलका चौकातून महात्मा फुले मंडईकडे जाणार असल्याने किमान दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांना सकाळी घ्यावा लागला. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी टीका केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका याची नोंद घ्यावी की, त्यांच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा महाआघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशा शब्दात काकडे यांनी   धमकी वजा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर, शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या प्रकल्पासाठी पाच हजार एकर जागा मिळवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे असे सांगत,  त्या उपकारांची जाणीव व्यापाऱ्यांना नसल्याचे,  काकडे म्हणाले.

अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती

''फत्तेचंद रांका यानी पत्रक काढले की, आम्ही आमची दुकान उघडी ठेऊ पण, तुमच्या मोर्चाला पाठींबा देऊ. त्यावर मी म्हटलं, आम्हाला व्यापाऱ्यांच्या पाठिंब्याची गरज नाही. तुमचा जर शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता तर चार तास दुकानं बंद ठेवायची होती. पण तुम्ही चार तास दुकानं बंद ठेऊ शकत नाही. फत्तेचंद रांका यांनी नोंद घ्यावी, की तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा महाआघाडीचे सरकार तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. या व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे. मागे शरद पवार यांनी व्यापार्यांच्या समस्यांसाठी बैठक घेतली. शहराच्या बाहेर पाच हजार एकरमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण या उपकारांची जाणीव व्यापाऱ्यांना नाही. मी सगळ्या  व्यापाऱ्यांच्या बद्दल बोलत नाही तर  व्यापाऱ्यांच्या नेत्यांबद्दल बोलतोय.''
- अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT