Crime_Arrest 
पुणे

गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना अटक; सातारामध्ये लावलेल्या सापळ्यात अडकले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकावर गोळीबार करून फरार झालेल्या कुख्यात गुन्हेगार गणेश पवार याच्या टोळीतील दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सातारामधील सुरूस फाटा येथे सापळा लावून अटक केली आहे.

सोन्या कांबळे आणि विशाल सोमवंशी अशी या दोघांची नावे आहेत.
गणेश पवार आणि त्याच्या टोळीने एकास गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संबंधितास कोयत्याने आणि हाताने मारहाण करीत तेथील परिसरात दगडफेक करून स्थानिकांच्या मनात दहशत निर्माण केली. शनिनगर परिसरात गुरुवारी (ता. 10) हा प्रकार घडला होता. या प्रकरणी सिद्धीकी मोला शेख (रा. शनिनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश पवार आणि त्याच्या टोळी विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार सर्फराज देशमुख आणि सचिन पवार यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की, पवार आणि सोन्या कांबळे यांनी गोळीबार केला आहे. कांबळे आणि विशाल सोमवंशी हे सातारा भागातील सुरूस फाटा येथे पळून गेले आहेत. त्यानुसार तेथे सापळा लावण्यात आला होता. तेव्हा त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

कांबळे याने गणेश पवार याच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस अंमलदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांनी ही कारवाई केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

Delhi NCR PUC Rule : आजपासून 'पीयुसी' नसलेल्या वाहनांना पेट्रोल-सीएनजी मिळणार नाही; नंबर प्लेटवरून होणार तपासणी

SCROLL FOR NEXT