bhatghar sakal
पुणे

Bhatghar Dam : सायरन वाजला, १५ मिनिटं सर्वांचं लक्ष एकाच ठिकाणी ; अशी पार पडली भाटघर धरणाच्या ४५ स्वयंचलीत दरवाजांची चाचणी

ब्रिटीशकालीन भाटघर धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्यामुळे जलसंपदा विभागाच्या वतीने धरणाच्या ४५ स्वयंचलीत दरवाजांची चाचणी घेण्यात आली.

विजय जाधव

भोर : तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्यामुळे जलसंपदा विभागाच्या वतीने धरणाच्या ४५ स्वयंचलीत दरवाजांची चाचणी घेण्यात आली. पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता.२) सकाळी १० वाजून ४५ मिनीटांनी सायरन वाजवून धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडण्यास सुरुवात केली. काही मिनीटांमध्ये सर्वच्या सर्व ४५ स्वयंचलीत दरवाजे उघडले गेले.

आणि १८ हजार ५०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु झाला. भाटघर धरणास ८१ दरवाजे असून त्यापैकी ४५ दरवाजे हे स्वयंचलीत आहेत. धरणातील पाणीसाठा १०० टक्के झाल्यानंतर स्वयंचलीत दरवाजे आपोआप उघडले जातात.

आणि पाणीसाठा कमी झाला की आपोआप बंद होतात. दोन दिवसांपूर्वीच धरणावरील वीजनिर्मिती केंद्र सुरु करून त्यामधून १ हजार ७५० क्यूसेक ने पाणी निरा नदीत सोडले जात आहे. स्वयंचलीत दरवाजांची चाचणी झाल्यावर १५ मिनीटांनंतर दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले.

दरम्यान स्वयंचलीत दरवाजांची चाचणी घेण्यापूर्वी पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे पूजन करण्यात आले. यावेळी नीरा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता योगेश भंडलकर, भाटघरचे शाखा अभियंता गणेश टेंगले, नाना कांबळे आदी उपस्थित होते.

२३.७४ टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर धरणात शुक्रवारी दुपारी एक वाजता ९८.९३ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान तालुक्यातील नीरा-देवघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून आणि सांडव्यातून ३ हजार ४०३ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे प्रशासनाकडून नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यात यावर्षी नीरा-देवघर धरण खो-यातील शिरगाव येथे सर्वाधिक ३ हजार ४०६ मिलीमीटर आणि भाटघर धरण खो-यातील भूतोंडे येथे ३ हजार ३२४ मिलीमीटर तर पांगारी येथे २ हजार ९४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी भाटघर धरण हे २० सप्टेंबरला १०० टक्के भरले होते. परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे २ ऑगष्टला धरणात ९९ टक्के पाणीसाठा झालेला आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी ५० दिवस अगोदरच धरण भरल्यामुळे भाटघर धरणाच्या पूर्वेकडच्या लाभक्षेत्राच्या जिल्ह्यातील नागरिकांचा उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT