भाटघर धरण काही तासांत भरणार sakal
पुणे

भाटघर धरण काही तासांत भरणार

गेल्यावर्षी भाटघर धरण २० ऑगस्टला भरले होते. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे धरण भरण्यास २० दिवस उशीर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

भोर : तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण भरण्याच्या मार्गावर असून धरणात शनिवारी (ता.११) सायंकाळी ९९.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील काही तासांमध्ये धरणात १०० टक्के पाणीसाठा होऊन धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाणार आहेत.

गेल्यावर्षी भाटघर धरण २० ऑगस्टला भरले होते. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे धरण भरण्यास २० दिवस उशीर झाला आहे. २३.७४ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या भाटघर धरणास ४५ स्वयंचलित दरवाजे आहेत. पाणीसाठा १०० टक्के झाल्यावर एकामागून एक असे स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडले जातात. शनिवारी सकाळी धरणात ९८.५३ पाणीसाठा झाला होता.

तेव्हापासून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, शाखा अभियंता अनिल नलावडे, नाना कांबळे, अमोल कापरे आदींसह तांत्रिक साहाय्यक धरणावर लक्ष ठेवून आहेत. धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले तर रविवारी (ता.१२) सकाळपर्यंत धरण भरण्याची शक्यता असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT