Eknath Shinde Vilasrao Deshmukh Bhide Wada Sakal
पुणे

Bhide Wada : विलासराव देशमुखांनी अनुदानाला मंजुरी दिली, एकनाथ शिंदेंनी आदेश दिले; स्मारक कधी होणार?

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भिडेवाड्याच्या विकासासंदर्भात बैठक पार पडली.

सकाळ डिजिटल टीम

सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जयंती पुण्यतिथीदिवशी कायम चर्चा होते, ती म्हणजे भिडेवाड्याची. भिडेवाड्याची दुर्दशा ही काही आजची गोष्ट नाही गेल्या अनेक दिवसांपासून या प्रश्नाचं घोंगडं भिजतच राहिलं आहे. सरकारं आली, गेली पण या प्रश्नावर उपाय सापडला नाही. पण विलासरावांच्या सरकारची गोष्ट काहीशी वेगळी होती.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही हा प्रश्न उपस्थित झाला होता. भिडेवाड्यात स्मारक व्हावे यासाठी स्थापन झालेल्या समितीने हा प्रश्न अनेकदा लावून धरला होता. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नी लक्ष घातलं. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी पुण्याचा दौरा कला आणि लगेचच स्थायी समितीमध्ये मुलींच्या पहिल्या शाळेचे स्मारक उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.

पण त्यानंतर हा प्रश्न प्रलंबितच राहिला. पुढच्या कोणत्याही सरकारला त्याविषयी ठोस पावलं उचलता आली नाहीत. आता पुन्हा एकदा राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारने या स्मारकाचं काम मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल छगन भुजबळ यांनी शिष्टाई केली, या विषयी आज बैठकही घेण्यात आली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. आता हे सरकार तरी भिडेवाड्याचा विकास आणि महात्मा फुलेंचं स्मारक उभारेल, अशी आशा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, मग त्यांना मारहाण का करता? उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंच्या नेत्याला फटकारले

Koyna Dam Alert : कोयना धरणात 24,938 क्युसेकने पाण्याची आवक; उद्या सकाळी 'या' वेळेत धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू होणार, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Latest Live Updates Marathi : माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो नागरिकांचे नांदणी मठात लाक्षणिक उपोषण सुरू

Nashik Crime: लाचप्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अडचणीत; एसीबीने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला

“आई आणि बहीण ५ वर्षांपासून बोलत नाहीत” राम कपूर खुलासा करत म्हणाला...'वडिलांना मृत्यू स्वीकारण्यात मदत केली'

SCROLL FOR NEXT