images.jpg
images.jpg 
पुणे

भीमा कोरेगाव चौकशी आयोग : साक्ष मराठीत, नोंद इंग्रजीत

सकाळवृत्तसेवा

पुणे : भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडून साक्षीदारांची साक्ष केवळ इंग्रजी भाषेतून नोंदवली जात आहे. साक्ष इंग्रजीसोबत मराठी भाषेतूनही नोंदवली जावी, असा लेखी अर्ज एका साक्षीदारामार्फत अॅड.संदीप डोंगरे यांनी आयोगाकडे सादर केला, मात्र आयोगाने हा अर्ज फेटाळला. 

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडून पुण्यातील साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरवात झाली. 3 ते 6 ऑक्‍टोबर या कालावधीत एकूण 17 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात येणार आहेत. आज गुरवारी (ता.4) काल साक्ष नोंदवलेल्या साक्षीदाराची उलट तपासणी झाली. विवेक जागरण मंचातर्फे अॅड. विजय सावंत, तसेच अॅड. नितिन प्रधान या दोघांनी साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. आणखी काही वकिलांना या साक्षीदाराची उलटतपासनी घ्यायची असून त्यासाठी त्यांनी आयोगानेकडे वेळ मागितला आहे. आयोगाने वेळ दिला आहे. 

काल दिलेल्या साक्षी दरम्यान साक्षीदाराने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाचा मूळ इतिहास तसेच पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या युद्धाचा सविस्तर इतिहास सांगितला. अनेक ऐतिहासिक दस्तऐवज यावेळी सादर करण्यात आले. कोरेगाव भीमामध्ये हिंसाचाराची घटना घडल्यानंतर तेथील विजयस्तंभ व वढू, कोरेगाव आदी गावांमध्ये जाऊन अनेक ऐतिहासिक बाबी, दस्तऐवज यावर साक्षीदाराने संशोधन केले आहे. त्यामुळे मूळ इतिहास व हिंसाचाराच्या घटनेनंतर याबाबत केली जाणारी मांडणी यातील तफावत समोर आणण्यासाठी साक्षीदाराने याबाबतची ऐतिहासिक तथ्ये सांगितली. माजी न्यायाधीश जे. एन. पटेल हे या आयोगाचे अध्यक्ष असून, सुमीत मलिक यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. या याआधी मुंबईतील साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यासाठी आयोगाने दोन वेळा साक्षीदारांना बोलावले होते. आतापर्यंत सुमारे 500 जणांनी साक्ष देण्याबाबत इच्छुक असल्याची प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे सादर केली आहेत. 

साक्ष मराठीत, नोंद इंग्रजीत 
चौकशी आयोगाकडून साक्षीदारांची साक्ष मराठी भाषेतून घेतली जात असली, तरी त्यांची लेखी नोंद मात्र केवळ इंग्रजी भाषेतून केली जात आहे. याबाबत अॅड. संदीप डोंगरे यांनी आयोगाला साक्षीदारांनी सांगितलेले तपशील इंग्रजीसोबत मराठी भाषेतही नोंदवले जावेत, अशी विनंती बुधवारी केली. मात्र यावर मराठी टायपिस्ट व इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, असे आयोगाने उत्तर दिल्याचे अॅड. डोंगरे यांनी सांगितले. आज साक्ष इंग्रजीसोबत मराठी भाषेतूनही नोंदवली जावी, असा लेखी अर्ज एका साक्षीदारामार्फत अॅड.संदीप डोंगरे यांनी आयोगाकडे सादर केला, मात्र आयोगाने हा अर्ज फेटाळला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT