पुणे

Bhimashankar Sugar Factory: ऊस उत्पादक शेतक-यांसाठी आनंदाची बातमी, भीमाशंकर साखर कारखान्याने दिला इतका भाव!

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

Latest sugarcane news: आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाला जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम राखत मागील सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी अंतिम ऊस दर प्रती मेट्रिक टनासाठी ३२०० रुपये जाहीर केला असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक-संचालक व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२३-२४ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख नऊ हजार ४६८ मेट्रिक टन ऊसासाठी कारखान्याने एफ.आर.पी. नुसार २७९०.१० रुपये प्रती मेट्रिक टन दर येत असतानाही यापूर्वी २९५० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम एकूण रक्कम ३२७ कोटी २९ लाख ३० हजार रुपये एकरक्कमी ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केलेली आहे.

याशिवाय १.८३ लाख मेट्रिक टन खोडवा उसासाठी १०० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ऊस तोडणी व वाहतूक खर्चात १३७ रुपये प्रती मेट्रिक टन वाढ होवूनही ३२०० रुपये प्रती मेट्रिक टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. अंतिम हप्ताची रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करण्यात येणार आहे.

कारखान्याने यापूर्वी एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर व खोडवा अनुदान वेळेतच अदा केलेले आहे. त्याशिवाय एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर अदा केलेला असूनही दरवर्षीप्रमाणे दिवाळीसाठी अंतिम हप्त्याचे स्वरुपात ऊस उत्पादक शेतक-यांना अदा करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांची दिवाळी गोड होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.

भीमाशंकर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीचा दर दिलेला असून यापुढेही हि परंपरा कायम राहील. तरी गाळप हंगाम २०२४-२५ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी अशी विनंती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT