bhor crime update 4 kg cannabis seized one accused arrested police Sakal
पुणे

Bhor Crime News : भोरला विक्रीसाठी आणलेला साडेचार किलो गांजा पकडला; तरुणास अटक

कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा भोर पोलिसांनी पकडला असून वाहतूक करणा-या तरुणाला अटक केली आहे.

विजय जाधव

Bhor News : कोकणात विक्रीसाठी पाठविण्यासाठी शहरात आणलेला सुमारे ४५ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा भोर पोलिसांनी पकडला असून वाहतूक करणा-या तरुणाला अटक केली आहे.

अजय किसन गुमाने (वय २१, रा. अनंतनगर झोपडपट्टी, भोर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून मंगळवारी (ता.५) रात्री सव्वाआठ वाजता शहरातील महाडनाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कोकणात विक्रीसाठी गांजा पाठविण्यात येणार असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी महाड नाका परिसरात पाळत ठेवली. रात्री सव्वाआठच्या सुमारास महाड नाक्यावरील महाडला जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूला संजयनगर कडे जाणा-या फाट्याजवळील अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीसमोर अजय गुमाणे आढळला. त्याच्याजवळील पोत्यात साडेचार किलो उग्र वास असलेला गांजा आढळून आला.

पोलिसांनी त्यास गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिस हवालदार दत्तात्रेय खेंगरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव पुढील तपास करीत आहेत. भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार,

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव व शिला खोत, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, अविनाश निगडे, गणेश कडाळे, सागर झेंडे व प्रियांका जगताप यांनी ही कारवाई केली. अजय गुमाणे यांने गांजा कोठून आणला आणि कोणाकडे पाठविणार होता. याचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT