Kunabi Caste Proof Sakal
पुणे

Bhor News : भोरमध्ये आढळले १८८८ सालातील संस्थानातील कुणबीचे पुरावे

कुणबीचे रेकॉर्ड शोधण्यासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, रेकॉर्डची तपासणी जोरात सुरु

विजय जाधव

भोर - मराठा आरक्षणासाठी झालेल्या लढ्यामुळे राज्यभरात शासनाने मराठ्यांच्या कुणबीच्या नोंदी रेकॉर्ड शोधण्याची मोहिम सुरु केली आहे. महसूल विभागाच्या भोर उपविभागातील भोर आणि वेल्हे तालुक्यात कुणबीचे रेकॉर्ड शोधण्यासाठी प्रशासनाने ताकद पणाला लावली आहे. भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सुट्टीच्या दिवशीही रेकॉर्ड शोधण्याचे काम सुरु ठेवले आहे.

शनिवारी (ता.४) रेकॉर्ड रुममध्ये १८८८ सालातील तत्कालीन भोर संस्थान मधील राजगड तालुक्यातील कुणबीचे पुरावे हाती लागले आहेत. हे पुरावे मो़ड़ी लिपीत असून तज्ञ व्यक्तीकडून त्याची खात्री करण्यात येत आहे. आजपर्यंत १८८८ सालातील तालुक्याच्या अतीदुर्गम भागातील साळुंगण गावचे कुणबीच्या नोंदी असलेले रेकॉर्ड, १९०५ सालातील शिवरे गावचे रेकॉर्ड़ आणि १९४५-४६ सालातील वीसगाव खो-यातील वरोडी ब्रु गावचे रेकॉर्ड आढळून आले आहेत.

कुणबी जातीच्या दाखल्यांसाठी अर्जे केलेल्या नागरिकांच्या अर्जावर तातडीने निर्णय देण्यात येत असल्याचेही प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले. जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत भोर आणि वेल्हे तालुक्यातील १ हजार ७४ जणांनी कुणवी दाखल्यांसाठी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी १ हजार ३० जणांना दाखले देण्यात आले आहेत.

केवळ १२ जणांना दाखले नाकारण्यात आले असून ३२ जणांच्या अर्जावर अद्याप निकाल देण्यात आलेला नसल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले. भोर तालुक्यातील कुणबी दाखल्यांसाठी अर्ज दाखल केलेल्या ७१० व्यक्तींपैकी ६९५ जणांना दाखले देण्यात आले असून २५ जणांच्या अर्ज अद्याप प्रलंबीत आहेत.

वेल्हे तालुक्यात अर्ज दाखल केलेल्या ३६४ जणांपैकी ३५४ जणांना दाखले देण्यात आले असून १२ जणांचे अर्ज नामजूर केले आहेत. तर ७ जणांचे अर्ज प्रलंबीत आहेत.

काही वर्षांपूर्वी पंचायत समितीची इमारत जळाल्यामुळे महसूल विभागाचे रेकॉर्डही जळीत झाले आहे. यामध्ये सर्वाधिक रेकॉर्ड हे किकवी आणि निगुडघर मंडलातील आहेत. ज्या गावचे रेकॉर्ड जळालले आहे. त्या गावातील नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले रेकॉर्ड महसूल विभागाकडे जमा करावे. त्याची खातरजमा व तपासणी करून संबंधीत नागरिकांना कुणबीचे दाखले देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : सांगली हादरली! 'हार्ट ऑफ सिटी'त पोरासमोरच बापाला ठेचून संपवलं, मुलालाही बेदम मारहाण, नेमकं काय घडलं?

Economic Survey 2025-26 : भारताची अर्थव्यवस्था कशी आहे? महागाई वाढणार? बजेटआधी जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे

Latest Marathi News Union Budget 2026 Live : बजेटआधी सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण

Union Budget : भारताचे २ असे अर्थमंत्री, ज्यांना अर्थसंकल्प सादर करण्याची मिळाली नव्हती संधी

Kolhapur Illegal Abortion : बेकायदेशीर उमलणाऱ्या कळ्या खुडायचा, गर्भपात करणारा बोगस डॉक्टर दोन महिन्यांनी पोलिसांच्या हाती; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT