भोसरी - चांदणी चौकाजवळ नेहमी होत असलेली वाहतूक कोंडी. 
पुणे

भोसरीतील कोंडीमुळे वाहनचालक बेजार

सकाळवृत्तसेवा

भोसरी - येथील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवारस्त्यावर दररोज सायंकाळी वाहनांची कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांमधून संताप व्यक्त केला आहे. ही कोंडी दूर करण्याबरोबरच बेशिस्त वाहनचालक, अतिक्रमण, पथारीवाले, हातगाडीवाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

भोसरीतील सेवारस्त्यावर दररोजी सायंकाळी भोसरी- आळंदी रस्ता चौक, पीएमटी चौक आदी भागांत खासगी प्रवासी वाहने थांबलेली असतात. तसेच, हातगाडीवाले व पथारीवाल्यांचे अतिक्रमणही असते. राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखालील चांदणी चौकात आळंदी रस्ता आणि दिघी रस्त्यावरून येणारी वाहने पीसीएमसी चौकाकडे वळतात. या चौकातून वाहने पुढे आळंदी रस्ता आणि मोशी मार्गाकडे जातात. दिघी रस्त्याने वाहनांची गर्दी असते. याच चौकातून पीएमटी चौकाकडे तसेच दिघी रस्त्याकडे वळणाऱ्या वाहनांमुळे चौकात वाहतूक कोंडी होते. बसथांब्याच्या जागेत खासगी वाहने थांबविली जातात, त्यामुळे बसला वळण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळेही वाहतूक कोंडी होते. बीआरटी टर्मिनल चौकातील पाच पदरी रस्त्यापैकी एक पदरी भाग बीआरटीएस बस टर्मिनलने, एकपदरी भागात पीएमपीएमएल बसथांबा, तसेच एकपदरी भाग खासगी प्रवासी वाहनांनी व्यापतो, त्यामुळे इतर वाहनांसाठी एकपदरी भागच शिल्लक राहतो. हा भागही काही वेळा खासगी प्रवासी वाहनांनी व्यापलेला असतो. याविषयी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाशी संपर्क होऊ शकला नाही.

भोसरी वाहतूक शाखेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. इंद्रायणी थडी संपल्यानंतर भोसरीतील वाहतुकीचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. सेवा रस्त्याच्या कडेला झालेल्या विविध विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडते.
- शिवाजी गवारे, पोलिस निरीक्षक, भोसरी वाहतूक विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Crisis News: अजिंठा-अंधारी प्रकल्पात पाणीपातळी घसरली; शिवना-मादणी गावांचा पाणीपुरवठा ठप्प, पावसाची प्रतीक्षा

Solapur Rural Health: सोलापूर जिल्ह्यात ‘देवाभाऊ जनआरोग्य अभियान’ला नाझरा येथून सुरुवात

Scholarship Achievement: जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत गणेशवाडी शाळेचे दोन विद्यार्थी; गंगापूर तालुक्यात सिद्धार्थ द्वितीय, श्रावणीची जिल्ह्यात नोंद

Success Story: श्रमशक्‍तीच्‍या जोरावर कावडीत ग्रामविकासाची नांदी! ‘धरण उशाला, कोरड घशाला’ शाप पुसण्‍यात यश, पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

Marathi Live Updates : राम मंदिर चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन

SCROLL FOR NEXT