Trupti Desai esakal
पुणे

Trupti Desai : 'त्यांना' जाऊन 24 तासही होत नाहीत तोच..; तृप्ती देसाई राजकारण्यांना म्हणाल्या 'निर्लज्ज'

पुण्यात (Pune) आज सर्वपक्षीय दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात (Pune) आज सर्वपक्षीय दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Trupti Desai News : पुण्यात (Pune) आज सर्वपक्षीय दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय (Fergusson College) रोडवर असलेल्या वाडेश्वर हॉटेलमध्ये या फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मात्र, या "सर्वपक्षीय दिवाळी कट्ट्याला" भूमाता ब्रिगेडच्या (Bhumata Brigade) तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी कडाडून विरोध दर्शवलाय. तृप्ती देसाईंनी फेसबुकवर पोस्ट लिहित हा विरोध दर्शविलाय. देसाईंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, आज वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सकाळी फराळ आयोजित करण्यात आला होता. खरंतर हा कार्यक्रम पुढं ढकलता आला असता. कारण, कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण (Vinayak Nimhan) यांचं अचानक निधन झालं. त्यांना जाऊन 24 तासही झाले नाहीत आणि आज फराळ करताना, पदार्थांवर ताव मारताना वाडेश्वर कट्ट्यावर दिसलेले आबांचे हे सर्वच सहकारी आणि जवळचे मित्र एन्जॉय करताना दिसले.

कदाचित, कट्ट्यावर श्रद्धांजलीही यांनी वाहिली असेल. परंतु, त्यांना दिलेला अग्नी अजूनही शांत झालेला नसताना हे जे सर्व झालं त्याचा आम्ही निषेधच करतो. आबांवर जी वेळ आली, ती सर्वांवरच एक दिवस येणार आहे. परंतु, राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात हाच मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्तीला पडलेला आहे, असं देसाईंनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT