Pune Accident Sakal
पुणे

Pune Accident : नवले पुलाजवळील भूमकर पुलावर कंटेनर उलटला; खोबरे तेलाचे वाहू लागले पाट

या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

विठ्ठल तांबे

धायरी : साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर खोबरे तेलाने भरलेला टँकर उलटला. ही घटना संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. परंतु रस्त्यावर खोबरे तेल पसरल्याने महामार्ग मोठ्या प्रमाणावर निसरडा झाल्याने, महामार्गावरील वाहतूक मंदावली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावरील वाहतूक संत गतीने पुढे जात आहे.

टँकर कोईमतूर तामिळनाडू येथून २४००० हजार लिटर खोबरे तेल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना, नऱ्हे येथील भुमकर पुलावर गिअर बॉक्स निकामी झाल्याने टँकर चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच सर्वत्र तेल पसरल्याने महामार्ग निसरडा झाला असल्याने इतर अपघात होण्याची शक्यता असल्याने सिंहगड वाहतूक विभाग व सिंहगड पोलीस वाहतूक सुरळीत करत आहेत.

घटनास्थळी सिंहगड पोलीस सिंहगड वाहतूक विभाग तसेच मनपा अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT