Workers@Warje-Bridge 
पुणे

पुणे : केवढी ही गर्दी! वारजे पुलाखाली जमले परप्रांतीय मजूर; मग पोलिसांनी...

सकाळ वृत्तसेवा

वारजे : परराज्यात जाण्यासाठी वारजे उड्डाणपूल येथे शेकडो मजूर जमा झाले होते. कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल या भीतीने वारजे पोलिसांनी या मजुरांवर सौम्य लाठीमार करत पिटाळून लावले.

वारजे- माळवाडी, शिवणे, कर्वेनगर, उत्तमनगर परिसरातील शेकडो मजुरांनी सोमवारी सकाळी वारजे पुलाखाली गर्दी केली होती. या पुलाखाली आपल्या राज्यांत कसे जावे, यासंबंधीचे पत्रक लावण्यात आले होते. त्यामुळे या परप्रांतीय मजुरांना येथून आपल्या गावी जायची माहिती असेल, म्हणून त्यांनी पोलिसांना विचारणा करायला सुरुवात केली. यावेळी मजुरांची संख्या वाढतच गेली. त्यांनतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत ही गर्दी पांगविली. 

पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर असल्याने परप्रांतीय मजुरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यांना त्यांच्या राज्यात जायला मिळावे, यासाठी हे मजूर एकत्र आले. वारजे पुलाखाली मजूरअड्डा भरत असतो. त्याच ठिकाणी गर्दी होत असल्याने बहुधा आपल्याला गावी जायची माहिती मिळणार, ही बातमी या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे येथे जवळपास 500 मजूर जमले होते. परिस्थिती आवाक्या बाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार करून पांगविले.

दरम्यान दुपार नंतर येथील बराटे चाळीत परप्रांतीय मजुरांची यादी तयार करण्याचे काम वारजे गावठाणात सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.

- कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT