3sant_sopankaka_palkhi 
पुणे

संत सोपान महाराज पालखी सोहळ्याबाबत मोठी मागणी 

दत्ता भोंगळे

गराडे (पुणे) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या संतश्रेष्ठ श्री सोपान महाराज पालखी सोहळ्याचे नियोजन व स्वरूप कसे असावे, याबाबत संतश्रेष्ठ श्री सोपान महाराज देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त ऍड. गोपाळ गोसावी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. याबाबत अंतिम निर्णय 29 मे रोजीच्या बैठकीत होईल, अशी माहिती सोपानदेव पालखी सोहळाप्रमुख श्रीकांत गोसावी यांनी दिली. 

या निवेदनात म्हटले आहे की, सोहळ्यातील उपस्थितांची संख्या 20 असावी व यात प्रमुख मानकरी, दिंडी प्रमुख सेवेकरी, चोपदार याचा समावेश असावा. ज्येष्ठ वद्य द्वादशी (18 जून) रोजी सासवड येथून आषाढ वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवावे. परंतु, पायी प्रवास टाळण्याचे उद्देशाने देवाच्या पादुका आषाढ शुद्ध दशमीपर्यंत सासवड येथील मंदिरातच ठेवाव्यात आषाढ शुद्ध दशमीला 30 जून रोजी दुपारी 12 वाजता सासवड येथून चार चाकी वाहनाने पंढरपूरकडे प्रस्थान होईल. या प्रवासासाठी राज्य सरकारने बस सेवा उपलब्ध करून द्यावी. पंढरपूर येथे चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, गोपाळपूर येथील काल्याचा प्रसाद, श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेणे, असे कार्यक्रम एकादशी ते पौर्णिमा, या काळात स्थानिक प्रशासनाच्या पूर्व परवानगीने होतील. 

हा सोहळा दरवर्षी एक महिना चालतो. यंदा 30 जून ते 5 जुलै या कालावधीत तो पूर्ण होईल. सोपानदेव पालखी सोहळ्याची परंपरा राखली जाईल व सद्यपरिस्थितीतून मार्गही काढला जाईल. त्यासाठी हा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. सरकारच्या सर्व नियमांचा व सूचनांचा आदर करून पालखी सोहळा संपन्न केला जाईल, अशी ग्वाही देवस्थानने सरकारला दिलेली आहे. या नियोजनाबाबत ऍड. गोपाळ गोसावी यांनी पालखी सोहळ्यातील प्रमुख दिंडी मालक, मानकरी, वारकरी व सेवेकरी यांच्याशी विस्तृत चर्चा केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT