construction sakal
पुणे

Construction Field : पुणे जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात वर्षाच्या प्रारंभीच मोठी उलाढाल

यंदाच्या वर्षातील पहिलाच महिना बांधकाम क्षेत्रासाठी मोठ्या उलाढालीचा ठरला. जानेवारी २०२३ मध्ये पुणे जिल्ह्यात सात हजार ७३६ कोटींचे मूल्य असलेल्या १२ हजार १६६ मालमत्तांचे व्यवहार झाले.

सकाळ वृत्तसेवा

यंदाच्या वर्षातील पहिलाच महिना बांधकाम क्षेत्रासाठी मोठ्या उलाढालीचा ठरला. जानेवारी २०२३ मध्ये पुणे जिल्ह्यात सात हजार ७३६ कोटींचे मूल्य असलेल्या १२ हजार १६६ मालमत्तांचे व्यवहार झाले.

पुणे - यंदाच्या वर्षातील पहिलाच महिना बांधकाम क्षेत्रासाठी मोठ्या उलाढालीचा ठरला. जानेवारी २०२३ मध्ये पुणे जिल्ह्यात सात हजार ७३६ कोटींचे मूल्य असलेल्या १२ हजार १६६ मालमत्तांचे व्यवहार झाले. त्यातून राज्याच्या महसुलात ४४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षाचा विचार करता यात ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मालमत्ता व्यवहारांमध्ये घरांच्या व्यवहारांचा वाटा सर्वाधिक आहे. नोंदणीकृत मालमत्तांपैकी प्राथमिक आणि दुय्यम निवासी सौद्यांचा वाटा ७३ टक्के आहे. पुणे जिल्ह्यातील निवासी मालमत्तेसाठी गृहखरेदीदारांकडून ५००-८०० चौरस फुटांच्या घरांना पसंती मिळाली आहे. तर २५ ते ५० लाख रुपयाच्या किमतीच्या घरांची सर्वाधिक खरेदी झाली आहे.

मुद्रांक वाढल्याची कारणे

  • घर खरेदीच्या व्यवहारांत झालेली वाढ

  • रिझर्व्ह बँकेने वर्षभरात अनेकदा रेपो दरात केलेली वाढ

  • गहाण दरात झालेली वाढ

पुण्यात ८० टक्के व्यवहार

मध्य पुणे, हवेली तालुका, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांचा समावेश असलेल्या निवासी व्यवहारातील सर्वात मोठा वाटा पुणे शहराचा आहे. जानेवारी २०२२ मध्ये ७९ वरून जानेवारी २०२३ मध्ये हा वाटा ८० टक्क्यांवर पोचला आहे. त्यानंतर पश्चिम पुण्याचा नंबर लागतो. ज्यात मावळ, मुळशी, वेल्हे आणि परिसराचा समावेश आहे.

पुण्यातील निवासी बांधकाम क्षेत्र हे अंतिम वापरकर्त्यांवर आधारित आहे. अलीकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बाजाराने गृहखरेदीबाबत कमालीची लवचिकता दर्शविली आहे. रेपो रेटमध्ये सलग वाढ, मेट्रो सेसची अंमलबजावणी आणि कोणतेही सरकारी प्रोत्साहन नसतानाही जानेवारीत घरखरेदी आकर्षक राहिली आहे. घर घेणे परवडण्याच्या क्षमतेला दिलेला पाठिंबा, मजबूत रोजगाराच्या शक्यता आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा हे शहरात घर खरेदीदारांचे स्वारस्य टिकवून ठेवतील.

- शिशिर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया

८०० चौरस फुटांच्या घरांना मागणी

५००-८०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांच्या मागणीचा हिस्सा जानेवारी २०२३ मध्ये जवळपास अर्धा आहे. मात्र, हा वाटा जानेवारी २०२२ च्या तुलनेत ५० वरून जानेवारी २०२३ मध्ये ४८ टक्क्यांपर्यंत घसरला. ५०० चौरस फूट घरांचा वाटा यंदाच्या व्यवहारांत २७ टक्के आहे. तर ८०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांचा हिस्सा गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत यंदा २२ वरून २५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT