The biggest beneficiary of the lockdown is the land records department 
पुणे

#Lockdown2.0 : लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा 'या' विभागाला; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने करून घेतला असल्याचे समोर आले आहे. या कालावधीत राज्यातील साडेचार हजार तलाठ्याकडून ऑनलाईनच्या माध्यमातून डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा आणि फेरफार उताऱ्याची कामे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे पन्नास हजाराहून अधिक डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा व फेरफार उतारा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 24 मार्च पासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. संचारबंदी असल्यामुळे तलाठी कार्यालय देखील बंद आहेत. या संचारबंदीच्या काळात या विभागाकडून नागरीकांना ऑनलाइन सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भूमी अभिलेख विभागाकडून यापूर्वीच ई.-फेरफार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अनेक सुविधा या ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा, फेरफार उतारा आणि "8 ड'चा नमुना पंधरा रुपये शुल्क आकारून ऑनलाइन उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी पेमेंट गटवेची सुविधा देखील खात्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनच्या काळात ई फेरफार प्रकल्पाचे काम भूमी अभिलेख विभागाकडून सुरू ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्य भरातील साडेचार हजार तलाठी "वॅक फ्रॉम होम'च्या माध्यमातून हे काम करीत आहे. आतापर्यंत सुमारे 50 हजाराहून अधिक डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा आणि ई -फेरफार उतारा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. दररोज सुमारे चार ते पाच हजार डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उताऱ्यांची त्यामध्ये भर टाकली जात आहे. त्यामुळे नागरिकांना शुल्क भरून घर बसल्या सातबारा आणि ई.-फेरफार उतारा मिळत आहे. 
ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास 

डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा आणि ई. फेरफार उतारा ऑनलाइन पंधरा रुपये शुल्क भरून उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी बॅंक ऑफ इंडियाबरोबर करार करण्यात आला आहे. त्यामध्ये आता बॅंक ऑफ बडोदा आणि मोबाईलच्या माध्यमातून ही पैसे भरण्याची सुविधा देण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर नागरिकांना आणखी पर्याय उपलब्ध होणार आहेत. 

लॉकडाऊनच्या काळातही राज्यभरातील तलाठी "वर्क फ्रॉम होम'च्या माध्यमातून काम करीत आहे. ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा आणि फेरफार उतारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. 
- रामदास जगताप ( उपजिल्हाधिकारी- ई. फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT