Biker paid a fine of Rs 42300 in Pune 
पुणे

अबब ! दुचाकीस्वाराने भरला तब्बल 42 हजार 300 रुपयांचा दंड !

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या एका नागरीकाच्या दुचाकीवर वाहतुक पोलिसांकडून तब्बल 42 हजार 300 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. दुचाकीच्या किंमतीजवळ पोचणारा 42 हजार 300 रुपयांचा दंड अखेर संबंधीत दुचाकीस्वारने भरला.

शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतुक पोलिस व सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष्य ठेवले जात आहे. त्यामध्ये वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधीत वाहनाचा मोबाईलवर फोटो काढून किंवा सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याच्या वाहनाचा फोटो घेऊन त्यास दंडाच्या रकमेचे ईचलन पाठविले जाते. त्यानुसार, त्या नागरीकाने ईचलन भरणे आवश्‍यक असते. मात्र सातत्याने नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची वाहतुक शाखेचे अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिदे व पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांच्या आदेशानुसार "टॉप 100' वाहनचालकांची यादी तयार करण्यात आली. तसेच त्यांना दंडाच्या रकमेचे ईचलन पाठविण्यात आले होते. मात्र वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

दरम्यान, वाहतुक पोलिसांनी या "टॉप 100' वाहनचालकांची शोध मोहिम हाती घेतली. त्यानुसार, एमएच 12 एफजी 4678 या क्रमांकाच्या दुचाकीवर तब्बल 42 हजार 300 रुपये इतका दंड आकारला होता. त्यानेही आत्तापर्यंत दंड भरण्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर संबंधीत वाहनचालकाचा पोलिसांनी शोध घेऊन त्यास त्याच्या दंडाची रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार, त्याने 42 हजार 300 रुपये इतकी दंडाची रक्कम भरली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना मराठी मातृभाषा, ना महाराष्ट्र जन्मभूमी; तरीही परदेशी कलाकाराच्या मराठी प्रेमाची सोशल मीडियावर चर्चा!

Punjab Industrial Investment : टाटा स्टीलसह अनेक कंपन्यांचे पंजाबमध्ये हजारो कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव; विविध जिल्ह्यांतील औद्योगिक प्रकल्पांची यादी समोर

Punjab Industrial Policy 2026 : उद्योगांच्या मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पंजाब सरकारचा पुढाकार; IBDP २०२६ आणि डिजिटल एकखिडकी प्रणालीचा विस्तार

भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी घसरण; एका आठवड्यात तब्बल १४.२ अब्ज डॉलरची घट, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दोनच दिवसांत सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रद्द

SCROLL FOR NEXT