पुणे

कोरोनाच्या जलद संशोधनासाठी जैवभांडार; लस आणि औषध निर्मितीसाठी उपयोग

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनासारख्या वैश्‍विक साथींसंबंधीचे संशोधन, जलद निदानासह सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वैद्यकीय नमून्यांच्या "जैवभांडार' (बायोरिपॉझिटरी) ची निर्मिती देशभरात करण्यात येत आहे. देशातील कोविड संशोधनाला दृतगती देणाऱ्या जैवभांडारांसंबंधी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकताच एक अहवाल सादर केला आहे. 

देश कोरोनाचा सामना करत असताना बाधित व्यक्तीचे जलद निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे. तसेच सार्वजनिक आरोग्याच्या विचार करता तातडीने संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. भविष्यात कोरोना आणि त्यासारख्या वैश्‍विक साथींचे गंभीर परिणाम बघता देशामध्ये वैद्यकीय नमुन्यांचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या "जैवभांडार'ची निर्मिती करण्यात येणार आहे. नीती आयोगाने नुकत्याच यासंबंधीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना देशभरातील प्रयोगशाळांना दिल्या आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जैवभांडारांची आवश्‍यकता 
- बाधित रुग्णाच्या नमुन्यांचे संकलन आणि जतन करणारी व्यवस्था देशात नाही 
- जैविक नमुन्यांचा औषधे, लस आणि इतर संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण उपयोग 
- संसर्गग्रस्तांचे निदान, उपचार पद्धत आणि व्यवस्थापनासंबंधी निर्णयांमध्ये महत्त्वाचे ठरते 
- विषाणू, जिवाणू किंवा इतर सूक्ष्मजीवांमध्ये होणारे म्युटेशन आणि मानवी शरिराशी असलेल्या संबंधांचा आढावा शक्‍य 

नियोजित जैवभांडारांची उद्दिष्ट्ये ः 
- कोविड-19च्या नमुन्यांचे संकलन, विलगीकरण आणि संवर्धन करणाऱ्या पूर्णवेळ रचनात्मक संस्थेची निर्मिती 
- उपचार पद्धती, लस आदींच्या संशोधनासाठी योग्य दर्जाची आणि न्याय पद्धतीने नमुने उपलब्ध करून देणे 
- भारतीय संशोधन संस्था, उद्योग आणि व्यावसायिकांना कोविडच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रेरित करणे 
- भारतीय परिपेक्षात कोविड-19संबंधीच्या संशोधनाला गती देणे 

अशी होणार अंमलबजावणी 
- आयसीएमआर, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या संस्थांच्या 16 प्रयोगशाळांचा सहभाग 
- रुग्णांकडून कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच नमुन्याचे संकलन 
- संकलित नमुन्यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसची निश्‍चिती 
- नमुन्यांच्या वापरासंबंधी राष्ट्रीय पर्यवेक्षण समिती 

या नमुन्यांचे होणार संकलन ः 
1) घशातील, नाकातील तसेच श्‍वासनलिकेतील द्रव पदार्थ 
2) थुंकी 
3) रक्त 
4) लघवी 
5) मल 

इतर आजारांसाठीही हवे जैवभंडार 
कर्करोगाशी निगडित 64 टक्के मृत्यू विकसनशील देशांमध्ये होतात. भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्‍यता असून, औषधांवरील संशोधनासाठी भारताने नवीन पिढीच्या जैवभंडारांची उभारणी करावी, असा अहवाल डब्ल्यूएचओ ग्लोबोकॅनने सादर केला आहे. मुंबई येथील भारतीय तंत्रशिक्षण संस्थेचे जैवतंत्रज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ प्रा.संजीव श्रीवास्तव म्हणाले,""देशामध्ये विविध प्रकारचे कर्करोग आढळतात. विकसित देशांमध्ये अशा वेगवेगळी वैशिष्ट्ये असलेल्या कर्करोगांवर संशोधन तुलनेने कमी होते. भारतामध्ये कायदेशीर दृष्ट्या तरतूद करून वैद्यकीय नमुन्यांचे जैवभंडार तयार करणे आवश्‍यक आहे.'' संसर्गजन्य आजारांचा वाढता धोका, बदललेल्या जीवनशैलींमुळे जडणारे दुर्धर आजार आणि सार्वजनिक आरोग्य बघता वैविध्यपूर्ण असलेल्या भारतात दर्जात्मक जैवभंडार उभे राहणे गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Khodke Accident : राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात; पक्षाच्या बैठकीला दुचाकीने जात असताना कारने दिली धडक!

Alcohol Risk : दारू पिऊन झाल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' 3 पदार्थ; नाहीतर हँगओव्हर होईल डबल अन् लवकरच गमवाल जीव

Karad Kidnapping Case : गाडी अडवली, मारहाण केली अन् उचलून नेलं; कऱ्हाडजवळ व्यापाऱ्याचे सिनेमा स्टाईल अपहरण!

Pune: मेट्रो प्रवाशांसाठी अलर्ट! कच्चे मांस आणि सुके मासे घेऊन प्रवास केल्यास ट्रेनमध्ये ‘नो एंट्री’; कठोर नियम लागू

Solapur Crime : घरगुती वादातून मुलाने केला वडिलांचा घात; वन्यप्राणी हल्ल्याचा बनाव करत लपवला होता गुन्हा!

SCROLL FOR NEXT