birth death register office
birth death register office sakal
पुणे

जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा सर्वर डाउन झाल्याने नागरिकांचा संताप

सकाळ वृत्तसेवा

पुणे महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा संगणक यंत्रणेचा सर्वर वारंवार डाउन होत असल्यामुळे नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.

वडगाव शेरी - पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal) जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा (Birth Death Register Office) संगणक यंत्रणेचा सर्वर वारंवार डाउन (Server Down) होत असल्यामुळे नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी, नागरिकांच्या रोषाचा आणि संतापाचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या तीन प्रभागातील नागरिक याठिकाणी जन्म-मृत्यूचा दाखला घेण्यासाठी येत असतात. याठिकाणी आल्यानंतर त्यांना काही कागदपत्रं सोबत एक अर्ज भरून द्यावा लागतो. त्यानंतर दाखला मिळण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. मात्र संगणक प्रणालीचा सर्वर डाऊन असल्यामुळे रांग पुढे सरकत नाही. रांगेत बसण्याची सोय नसल्यामुळे तासन्तास रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. जेष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. असा प्रकार गेली पंधरा दिवसांपासून सुरू असल्याची माहिती येथील एका कर्मचाऱ्याने दिली.

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर जन्म मृत्यू दाखला विभागात मंगळवारी (ता 21) सकाळपासून सर्वर डाऊन होता. त्यामुळे नागरिकांच्या शब्दांचा भडीमार येथील कर्मचाऱ्यांना सहन करावा लागला. नागरिकांचा रोष वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी सांखिकी विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यानंतर काही वेळाने संगणक प्रणाली सुरू झाली.

याविषयी या विभागाचे पर्यवेक्षक योगेश शिर्के म्हणाले, सांख्यिकी विभाग प्रमुखांना सांगितल्यानंतर सर्वर पुन्हा सुरू झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे संगणक प्रणालीचा सर्वर वारंवार डाऊन होतो.

पुणे महापालिकेचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख राहुल जगताप म्हणाले, संगणक प्रणालीच्या सर्वर मध्ये काही तांत्रिक दोष होते. ते दूर करण्यात आले असून यापुढे सर्वर डाऊन होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; एरर 502 काय आहे?

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: शिवम दुबे गोलंदाजीला आला अन् चेन्नईला विकेटही मिळवून दिली; बेअरस्टोचं अर्धशतक हुकलं

SCROLL FOR NEXT