पुणे : देशभर गाजलेल्या पुण्यातील बिटकॉईन या आभासी चलनाच्या फसवणुक प्रकरणाला पाच वर्षानंतर अचानक नवे वळण मिळाले. संबंधित प्रकरणामध्ये प्रारंभी सायबर तज्ज्ञ म्हणून काम केलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी शनिवारी अटक केली. या बिटकॉईन प्रकरणामध्ये एका आरोपीने पोलिसांचीच फसवणूक करीत स्वतःच्या नावावर 60 पेक्षा जास्त बिटकॉईन केल्याची धक्कादाय माहिती पुढे आली आहे. संबंधित आरोपीने "आयपीएस' पदाचा राजीनामा देऊन सायबर तज्ज्ञ म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर हा घाट घातला होता. संबंधीत संशयित आरोपी हे तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे निकटवर्तीय आहेत.
पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड), रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिटकॉईन चलनामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील असंख्य नागरीकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार 2018 मध्ये उघडकीस आला होता. याप्रकरणी दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते.
संबंधित गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून केले जात होते. परंतु बिटकॉईनचा हा नवा गुन्हा असल्याने, तसेच त्याच्या तांत्रिक तपासासाठी तसेच आरोपींची मालमत्ता जप्त करण्यासाठी सायबर पोलिसांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्यामध्ये "ग्लोबल ब्लॉकचेन फाऊंडेशन'चा पंकज घोडे व "के.पी.एम.जी'च्या रविंद्र पाटील या दोघांची पोलिसांनी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. देशभर गाजलेल्या या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारव्दाज याच्यासह 17 आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून फक्त 241 बिटकॉईन जप्त केले होते.
दरम्यान, पोलिसांना या प्रकरणामध्ये सायबर तज्ज्ञांची भुमिका संशयास्पद वाटली. त्यामुळे राज्य आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस महासंचालकांकडून सप्टेंबर 2020 मध्ये या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार, पुणे पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु केला होता. संबंधित गुन्ह्याच्या तांत्रिक तपासाचे फॉरेन्सिक ऑडिट केले. त्यावेळी संबंधित सायबर तज्ज्ञांनी केलेल्या असंख्य संशयास्पद गोष्टी पुढे आल्या. त्यानंतर सायबर पोलिसांनी दोघांनाही त्यांच्या घरातुन पोलिस बंदोबस्तात अटक केली.
सायबर पोलिस ठाण्याच्या तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांनी बिटकॉईनसंबंधीचा महत्वपुर्ण डेटा विश्वासाने घोडे व पाटील या सायबर तज्ज्ञांकडे दिला होता. असे असतानाही त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. पाटीलने एका आरोपीच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वत:च्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. आतापर्यंतच्या तपासामध्ये पाटील याने 60 पेक्षा जास्त बिटकॉईन स्वतः सह इतर साथीदारांच्या वॉलेटवर बिटकॉईन वर्ग केले आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
* 100 बिटकॉईन पळविणारा घोडे होता शुक्लांचा निकटवर्तीय
तत्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या कालावधीत बिटकॉईन फसवणुक प्रकरण पुढे आले होते. त्यांचा निकटवर्तीय म्हणून सायबरतज्ज्ञ घोडे याची ओळख आहे. त्यानेच पोलिस अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन पंचनामे करताना आरोपींच्या वॉलेटमधील ब्लॉकचेनचे स्क्रीनशॉट बनावटीकरण केले. हेच या बनावट स्क्रीनशॉट खरे असल्याचे भासवून त्याने तपासासाठी सादर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तसेच त्याने वॉलेटमधील पुर्ण बिटकॉईन जप्त न करता त्यात काही बिट कॉईन शिल्लक ठेवून शासनाची फसवणूक केली केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. घोडे याने 100 पेक्षा जास्त बिटकॉईन स्वतःच्या नावावर केले आहेत.
* पाटील होता "आयपीएस' अधिकारी
पाटील हा भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) 2004 च्या तुकडीतील पोलिस अधिकारी होता. परंतु, त्याने संबंधित नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर तो सायबरतज्ज्ञ म्हणून काम करीत होता. पाटील हा 2004 च्या बॅचचा आयपीसएस अधिकारी आहे. मात्र, त्यानंतर त्याने नोकरीचा राजीमाना दिला होता. या सगळ्या घडामोडीनंतर तो सायबर तज्तज्ञ म्हणून कार्यरत राहीला, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.