chandrakant patil 
पुणे

चंद्रकांत पाटील यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी रविवारी टिळक चौकात निदर्शने केले. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गर्दी जमविण्यास प्रतिबंधात्मक आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाटील यांच्यासह 50 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्यांची जीप ठेवण्यात आली होती.  त्याअनुषंगाने सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना झालेली अटक, मुंबई पोलिस आयुक्तांची बदली आणि त्यापाठोपाठ परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पत्राद्वारे केलेला गौप्यस्फोट या घडामोडी एकापाठोपाठ घडल्या. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्यावरील आरोपानंतर भाजपने पुण्यासह राज्यभर आंदोलन करीत देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानुसार, शहर भाजपच्यावतीने रविवारी देशमुखांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी टिळक चौकात आंदोलन केले. या आंदोलनामध्ये चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. 

शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. असे असतानाही भाजपने संबंधीत आदेशाचे पालन न करता आंदोलन केले. त्यामुळे पाटील, मुळीक, टिळेकर यांच्यासह 50 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा का? ते शरद पवारांकडून  अनिल देशमुखांना अभय

""कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर बेकायदेशीर जमाव जमविणे, आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, कलम 188 नुसार पोलिसांच्या सुचना तसेच कलम 269/70 नुसार साथरोगासंबंधीच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही खबरदारी न घेता स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण केला. त्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.'', असं वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे( विश्रामबाग पोलिस ठाणे) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मेट्रो-५ प्रकल्पाला अखेर गती! भोईरवाडी-उल्हासनगरसाठी एमएमआरडीएच्या निविदा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Post Recruitment 2026: भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी! महिन्याला ६३ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Marathi News Live Updates : वस्तुस्थिती स्पष्ट असून आणि या न्यायालयाच्या निकालांची ती कवेत येत असूनही, अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेतला नाही - सिब्बल

SCROLL FOR NEXT