Chandrakant Patil Sakal
पुणे

माजी मंत्री म्हणू नका वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी जीएसटीवरून पवारांचा चेहरा उघडा पडला असंही म्हटलं. तसंच माजी मंत्री म्हणू नका या वक्तव्यावर स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

पुणे - पुण्यात मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मला माजी मंत्री म्हणू नका याची क्लिप चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आली. माजी मंत्री म्हणू नका हे दुसऱ्या नेत्यासाठी होतं असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच माझ्या वक्तव्याची राज्यभर चर्चा झाली. पण माझा असा कोणताही हेतू नव्हता. तसेही एखाद्या वक्तव्याने फारसं नुकसान होत नसेल तर बोला असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. सनसनाटी बातम्या निर्माण केल्यानं काही होत नाही. एकाही आमदाराला ते घेऊ शकत नाहीत. या राज्याचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे की पिंपरी चिंचवडचे हे समजत नाही. ते कोरोना काळात राज्यात बाहेर कुठं गेले. पिंपरी चिंचवडची महापालिका माझ्या नेतृत्वाखाली होणार असं म्हणून त्यांनी स्वत:ला लहान केलं असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

फोडाफोडीच्या राजकारणाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कितीही माणसं पळवण्याचा प्रयत्न करा काही होणार नाही. तसंच लोकांचे नगरसेवकांवर प्रेम नाही मोदींवर प्रेम आहे. त्यामुळे जाणाऱ्यांनी विचार करावा. तुम्हाला पुन्हा परतीची वाट नाही असा इशाराही त्यांनी दिला.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंजाबमध्ये काय झालंय पाहा. जहाज बुडतं तेव्हा सर्वात शेवटी कॅप्टनने बाहेर पडायचं असतं. आता पंजाबमध्ये कॅप्टनने राजीनामा दिलाय, जहाज बुडालं असं चंद्रकांत पाटील म्हणाले. जीएसटीवरून पवारांचा चेहरा उघड झाला. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर नगदी पैसा हवाय. त्याच्यावर राज्य चालवायचं आहे. तुम्ही का विरोध करता, लखनऊला का गेला नाहीत असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

जयंत पाटील आणि फडणवीस यांनी शनिवारी एकाच गाडीतून प्रवास केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्याबाबत विचारले असता राजकारण राजकारणाच्या जागेवर असतं. शहादा सारख्या लहान गावात ते एकत्र गेले अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसंच आपल्याला कोणी राज्यपाल करतंय, कोणी केंद्रीय मंत्री करतंय, यामुळे मला खूप बरं वाटतंय असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Credit Card Rule: किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले! शेतकऱ्यांना आता सहज कर्ज मिळणार; कागदपत्रांची कटकट कमी, RBI चा मोठा निर्णय

IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

Udgir News : मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्टला तीन अतिरिक्त डबे; १७२ अतिरिक्त प्रवाशांना लाभ

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT