pune
pune  
पुणे

मावळ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व 

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्‍यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चारपैकी ओझर्डे, औंढे खुर्द व नाणोली तर्फे चाकण या तीन ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले. टाकवे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.  निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. मावळ तालुक्‍यातील वराळे, पुसाणे व शिलाटणे या तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदासह संपूर्ण निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली असून इतर चार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी व सदस्यत्वाच्या 16 जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी सोमवारी (ता. 25) येथील महसूल भवनात तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

नाणोली तर्फे चाकण ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाच्या सातही जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. येथे सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोनिका शिंदे यांनी विजय मिळवला. त्यांना 254 मते मिळाली. 

इतर ग्रामपंचायतीमधील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
औंढे खुर्द : सरपंच : अरुण चव्हाण (550). 
सदस्य : प्रभाग 1 : नीलेश नाणेकर (259), रोशना पाठारे (257), सुरेखा केदारी (238). 
प्रभाग 2 : अरुण चव्हाण (259), रत्ना खाडे (255), विलास कदम, संदेश मांडेकर, ज्योती जांभूळकर, मृणाली मांडेकर (सर्व बिनविरोध). येथे महेश पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

टाकवे खुर्द : सरपंच : तुशांत ढमाले (325). 
सदस्य : प्रभाग 1 : ज्योती धुमाळ (192). 
प्रभाग 2 : मनीषा गरुड (146), शालन गरुड (120), विजय गरुड (143). 
प्रभाग 3 : ज्योती ढमाले (195), संपत गरुड (169), बाबाजी ओव्हाळ, शांताराम गायकवाड, सुवर्णा गायकवाड (सर्व बिनविरोध ). येथे सुधाकर म्हंकाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

ओझर्डे : सरपंच : बाळू पारखी (450). 
सदस्य : प्रभाग 1 : दत्ता ओझरकर (126). 
प्रभाग 2 : स्वप्नील येलमारे (154), आशा ओझरकर (185), अंजना ओझरकर (186). 
प्रभाग 3 : मंगल पारखी (243), स्वाती घारे, विजय पारखी (दोघेही बिनविरोध). येथे दीपक राक्षे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

दरम्यान, भाजप कार्यालयात आमदार बाळा भेगडे व तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्या हस्ते नाणोली तर्फे चाकण, ओझर्डे व औंढे खुर्द येथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. 

केदारी यांना नशिबाचा कौल 
औंढे खुर्द ग्रामपंचायतीत प्रभाग एकमधील जागेवर सुरेखा केदारी व नंदा ठाकर यांना प्रत्येकी 238 अशी समान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून करण्यात आलेल्या निवडीत सुरेखा केदारी यांना नशिबाचा कौल मिळाला. ओझर्डे येथे सरपंचपदासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बाळू पारधी यांनी 19 मतांनी विजय मिळवला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

Kolhapur Crime : राधानगरी तालुक्यात मुलाने वडिलांचा गळा आवळून केला खून; घरगुती वादातून उचललं टोकाचं पाऊल

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT