BJP
BJP Sakal
पुणे

निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्ते रस्त्यावर; सव्वा लाख घरात संपर्क

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेची निवडणूक (Pune Corporation Election) अवघ्या काही आठवड्यांवर आलेली असताना भाजपने (BJP) त्यांची संघटना रस्त्यावर उतरवली. केंद्र सरकारने राबविलेल्या योजना आणि पुणे महापालिकेत केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपचे २१ हजार ११५ कार्यकर्त्यांनी १ लाख २३ हजार घराशी संपर्क साधला. (Pune Municipal Corporation election News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, महापौर मुरलीधर मोहोळ, संघटन सरटिणीस राजेश पांडे आदी यामध्ये सहभागी झाले होते.

डॉ. भारती पवार यांनी महासंपर्क अभियानानिमित्त जहाँगीर रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. मोदी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांनी माहिती दिली. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांना भाजपने योजनांची माहिती देणारी पुस्तिका देऊन संवाद साधला. तसेच शहर भाजपच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

शहरातील एकूण २ हजार ८५४ बूथ पैकी २ हजार ६४९ बूथवर संपर्क झाला. यामध्ये २१ हजार ११५ कार्यकर्ते सहभागी झाले, त्यांनी १ लाख २३ हजार ३४३ घरांपर्यंत संपर्क केला. यामध्ये कला, क्रीडा, साहित्य, शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक यासह इतर क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले.

गेले वर्षभर आम्ही भाजप संघटनेची रचना लावत होतो, ही संघटना मतदारांपर्यंत पोहोंचण्यासाठी आज झालेल्या परिक्षेत आम्ही उत्तीर्ण झालो आहोत. त्यामुळे भविष्यात आम्ही कोणतेही आव्हान स्वीकारू शकतो असा विश्‍वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे, असे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

Latest Marathi News Live Update: मुंबईच्या घाटकोपर येथे ४० फ्लेमिंगो मृत अवस्थेत आढळले, कारण आलं समोर

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

SCROLL FOR NEXT