bjp leader chandrakant patil controversial statement dr apj abdul kalam 
पुणे

Video:चंद्रकांत पाटील पुन्हा ट्रोल; डॉ. अब्दुल कलामांविषयी दिला चुकीचा संदर्भ

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरीली टीका असेल तर, कधी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करणं असेल, चंद्रकांत पाटील सातत्याने मीडियामध्ये चर्चेत असतात. आजही, ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत. पण, एका वेगळ्या करणाने पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याविषयी चुकीचा संदर्भ दिला आहे. त्यामुळं त्यांना सोशल मीडियावर या विषयी चर्चा सुरू झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पुण्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना, चंद्रकांत पाटील विविध विषयांवर बोलत होते. ते म्हणाले, 'राष्ट्रप्रेमी मुस्लिम समाजाला विरोध नाही. पण, जे स्लिपर सेल म्हणून काम करतात त्यांना विरोध करायचा नाही का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना प्राधान्य दिले. मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले होते. डॉ. कलाम यांना मुस्लिम म्हणून नव्हे तर, कर्तृत्ववान, संशोधक म्हणून संधी दिली होती.' भाजप युवा मोर्चातर्फे आयोजित 'युवा वॉरियर्स या कार्यक्रमात बोलत होते.

चुकीचा संदर्भ
मुळात डॉ. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपती पदाची कारकीर्द आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ यात खूप मोठा फरक आहे. डॉ. अब्दुल कलाम 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या काळात राष्ट्रपतीपदावर होते. त्यावेळी पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजयपेयी होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची धुरा 2014मध्ये हाती घेतली. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांनी तरुणांच्या कार्यक्रमात दिलेला संदर्भ चुकीचा असल्याचे स्पष्ट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT