BJP_Pune 
पुणे

भाजपला घरचा आहेर; गावांच्या महापालिकेत समावेशाचं एका आमदारानं केलं स्वागत!

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्याचा निर्णय बुधवारी (ता.23) राज्य शासनाने घेतला. याबाबत महाविकास आघाडीने याचे स्वागत केले आहे. पण राज्यातील विरोधी पक्ष व पुणे पालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. असे असले तरी शहरातील भाजपच्या एका आमदाराने मात्र या निर्णयाचे स्वागत केले. 

दरम्यान, राज्य सरकारने हा निर्णय राजकीय हेतू समोर ठेऊन आणि घिसाडघाईने घेतला आहे. अधिसू्चना काढताना घाई गडबडीत घेतला आहे. गावातील नागरिकांच्या अपेक्षा धुडकालावल्या आहेत. पालिकेत समावेश झाल्यानंतर या गावांच्या विकासासाठी सरकार किती निधी देणार कारण कोरोनाच्या संकटामुळे पालिकेचे उत्पन्न घटले आहे. आता पालिकेत २३ गावांची भर पडली. परिणामी विकासकामांसाठी खर्चाचा मेळ बसविताना प्रशासनाची तारांबळ होणार आहे. आणि नव्याने समाविष्ट गावातील नागरिकांची मात्र फरफट होणार आहे.याबाबत सरकार काहीच विचार केल्याचे दिसत नाही. असा नाराजी सूर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, "न्यायालयाच्या आदेशानुसार ही २३ गावे टप्प्याटप्प्याने पालिकेत समाविष्ट होणार होती. ती आता झाली आहेत. या २३ गावांच्या विकासासाठी नऊ हजार कोटींची निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार, तो निधी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी द्यावा."

गावांच्या समावेशाचे स्वागत खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी मात्र जाहीर स्वागत केले आहे. आमदार तापकीर म्हणाले, "माझ्या मतदारसंघातील सात गावांचा बुधवारी महापालिकेत समावेश झाला आहे. गावांचा पालिकेत समावेश व्हावा. यासाठी मी गेली काही वर्ष विधानसभेत देखील मागणी केली होती. हवेली तालुका नागरी कृती समितीच्या सोबत मी होतो. युती सरकार असताना १९९७ गावांचा समावेश केल्यानंतर त्यांचा सर्वांगीण विकास झाला. अशाच पद्धतीने आता घेतलेल्या २३ तेवीस गावांचा आणि यापूर्वी घेतलेल्या ११ गावांचा विकास करावा. १९९७ पेक्षा सध्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेले आहे. यामुळे तातडीने या ठिकाणी पायाभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेने सुरवात करणे गरजेचे आहे.

राज्य सरकार आणि महापालिका यांनी मिळून या गावांसाठी निधी द्यावा. पूर्वी घेतलेल्या ११ गावात आरोग्य सुविधा पूर्णपणे पालिका अद्याप देत नाही. गावाचा विकास करताना तेथील जमा  झालेला कर त्याच परिसरात विकास निधी म्हणून वापरावा. आरोग्य, अंगणवाडी, शाळेतील शिक्षक या बाबतीत देखील राज्य शासनाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे."

आमच्या पक्षाने पक्ष पातळीवर घेतलेली भूमिका आहे. राजकीय हेतू न ठेवता हा निर्णय घेतला पाहिजे होता. आणि गावे घेताना त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने निधीची मागणी केली आहे. गावे घेण्याबाबत विरोध केलेला नाही. तसेच मी मतदार संघाच्या हिताच्या निर्णयाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. असे ही आमदार तापकीर यांनी स्पष्ट केले. 

तापकीर यांच्या मतदार संघातील आता सात गावांचा तर दोन वर्षांपूर्वी तीन अशा दहा गावांचा पालिकेत समावेश झाला आहे. यामुळे, या गावांचा विकास करताना व्यापक विचार केला जातो. ग्रामपंचायत पेक्षा महापालिकेला थेट निर्णय घेता येतो. यामुळे, मतदार संघातील कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. त्याबाबत पालिका पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे.

तसेच खडकवासला, नांदेड, नांदोशी, नऱ्हे किरकटवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याबाबत योग्य व्यापक भूमिका घेतली जाईल. कोंढवे धावडे, शिवणे, उत्तमनगर व न्यू कोपरे या गावाच्या सध्याच्या पाणी वितरण व्यवस्था सुधारित होईल, या गावातील मुख्य व अंतर्गत रस्ते, नांदेड शिवणे नदीवरील पूल अशा अनेक कामे मार्गी लागतील. याचा फायदा तापकीर यांना होणार असल्याने त्यांनी पहिल्यापासून या गावांच्या समावेशाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन हवेली तालुका नागरी कृती समितीला देखील मदत केली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT