Jaykumar Gore 
पुणे

पवारसाहेब मोदीबागेत राहतात हे मला माहितीही नाही : जयकुमार गोरे

अमोल कविटकर

पुणे : भाजपचे २० ते २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकीकडे मुंबईत केला आणि दुसरीकडे लागलीच भाजपचे माणचे आमदार जयकुमार गोरे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुण्यातील निवासस्थान असलेल्या मोदीबागेत पोहोचले. गोरे हे पवार यांच्याच भेटीला आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. मात्र काहीच वेळात गोरे हे खासगी कामानिमित्त मोदीबागेत आल्याचे पुढे आले आणि पवार-गोरे भेटीच्या चर्चेचा धुराळा खाली बसला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी भाजपाच्या गोटात प्रवेश करत आमदारकीची माळ पुन्हा गळ्यात घातली. मात्र त्याचदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोपाची चर्चा अजूनही संपलेली नाही. त्यातच ही भेट झाल्याच्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात क्षणातच पसरली तरीही अनेक जण यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते आणि झालेही तसेच.

या कथित चर्चेनंतर पवार खासगीकामानिमित्त बाहेर पडत असतानाच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठले. जयकुमार कुमार गोरे तुमच्याकडेच आले होते का? असा प्रश्न विचारताच पवारही आश्चर्यकारक चेहऱ्याने पवार म्हणाले, 'माझ्याकडे? तुम्हाला (पत्रकारांना उद्देशून) झालंय तरी काय? या भेटीचे पवार यांनी खंडन केल्यावर जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क केला, त्यावर ते म्हणाले, 'पवार साहेब मोदीबागेत राहतात हे मला माहितीही नाही. मी त्यांची भेट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तेही मला भेट देतील असे वाटत नाही. मी माझ्या कुटूंबियांसमवेत खासगी कामानिमित्त मोदीबागेत गेलो होतो. माझा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. कोण कोणाच्या संपर्कात आहे. हे समजायला जास्त काळ राहिलेला नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gay Dating App : गे-डेटिंग अ‍ॅपवरून सूत जुळलं; समलैंगिक संबंधांच्या इच्छेने तरुण भेटला, सात जणांच्या टोळीने गुजरातमध्ये जे केलं ते भलतचं

'लगान' फेम मराठी अभिनेत्रीने वयाच्या ६०व्या वर्षी फेसबूक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; म्हणते- फक्त ७५ दिवसात...

IPL 2027 Updates: ९४ नव्हे ७४ सामनेच... आयपीएल तारखांमध्ये बदल, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नव्हे तर... ; BCCI ने दिले अपडेट्स

Ambarnath Case : विवाहानंतर अवघ्या ६० दिवसांत काय घडलं? अंबरनाथमध्ये २८ वर्षीय विशाखाने बेडरूममध्ये घेतला गळफास; हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला मोठा दंड, तिलक वर्मावरही कारवाई; श्रीलंका दौऱ्यातील वादानंतर BCCIची मोठी अ‍ॅक्शन?

SCROLL FOR NEXT