Mukta Tilak 
पुणे

Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

गेल्या काही महिन्यांपासून मुक्ता टिळक या आजारी होत्या.

सकाळ डिजिटल टीम

Mukta Tilak Passes Away : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, याच ठिकाणी त्यांनी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या त्या भाजपच्या विद्यमान आमदार होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअॅम्ब्युलन्सनं नेण्यात आलं होतं. मुक्ता टिळक यांनी सन २०१७ ते २०१९ या काळात शहराचे महापौरपद भूषवलं होतं.

मुक्ता टिळक यांची अशी होती कारकीर्द

मुक्ता टिळक यांचं शालेय शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झालं आणि त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. मानसशास्त्र या विषयातून त्यांनी एमए केलं पुढे त्या एमबीए देखील झाल्या. सन २००२ साली मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. पुणे महापालिकेत स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. पुणे महापालिकेत त्यांची उत्तम कामगिरी पाहता भाजपनं त्यांना सन २०१९ मध्ये कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic : ऐन दिवाळीत खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; वाहनचालक हैराण, सातारा-पुणे महामार्गावर लांबलचक रांगा

VIDEO : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, अनेक प्रवासी जखमी; सकाळी ७ वाजता घडली दुर्घटना

संदर्भ पत्र का दिले नाही? जातीयवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्राचार्यांनी केला खुलासा

Diwali Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी नाही तर 'या' वेळी होणार; का बदलली वेळ?

Latest Marathi News Live Update : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग

SCROLL FOR NEXT