पुणे

भाजपाने बारामतीत जाळला गृहमंत्र्यांचा पुतळा

मिलिंद संगई

बारामती : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत बारामतीत रविवारी (ता. 21) भाजपाच्या वतीने आंदोलन केले. या प्रसंगी अनिल देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारचा यावेळी ढोल वाजवत निषेध करण्यात आला.

शहरातील भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभाजवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत जोरदार घोषणा दिल्या. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री खंडणीखोर असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. देशमुख यांच्या निषेधाच्या घोषणा देत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी करण्यात आली. बारामती शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान शेतक-यांना नुकसान भरपाई न देणे, संपूर्ण कर्जमाफी न करणे, नियमित कर्ज परत करणा-या शेतक-यांच्या खात्यावर 50 हजार रुपये जमा न करणे, कोविड काळातील वीज बिल माफ न करता कारवाई करत वीज तोडणे, शेतक-यांची वीज कापल्याने अनेकांना वणवण करावी लागत आहे, याचा निषेध करणारे सरकारच्या विरोधातील निवेदन देण्यात आले. 

बारामती शहरातील नीरा डावा कालव्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण थांबविण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. या मुळे पाझर बंद होऊन विहीरी व विंधनविहीरी आटतील त्या मुळे उन्हाळ्यात बारामतीकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागेल, असा आरोप करण्यात आला आहे. भाजपाचे शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व  कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT