Vinayak Ambekar
Vinayak Ambekar Sakal
पुणे

भाजप प्रवक्त्याला मारहाण; राष्ट्रवादीच्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

दत्ता लवांडे

पुणे : भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना त्यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांविरूद्ध भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम ५०४, ३२३ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(BJP Spokesperson Vinayak Ambekar Beat By NCP Karyakarta's)

फेसबुकवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शनिवारी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींपैकी कुणालाही अटक केलेली नाही.

दरम्यान भाजपाचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरूद्ध फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण केली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या घटनेचा निषेध करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चौघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला; धरणात जलसमाधीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

SCROLL FOR NEXT