BJP staged a symbolic fast at Sant Dnyaneshwar Maharaj temple in Alandi to open temples in the state 
पुणे

''सरकारला डोकेच नाही, दिल्लीच्या इशाऱ्यावरून चालते सरकार!''

विलास काटे

आळंदी : ''हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून अपेक्षा होती की, राज्यात मंदिर पहिले आणि मदिरा नंतर उघडतील मात्र, मंदिरे उघडली की आपल्याला सुबुद्धी मिळेल याची भिती ठाकरें सरकारला आहे. खुर्चीच्या मोहात अडकलेल्या सरकारला डोकेच नाही. सगळे निर्णय दिल्लीतून चालत आहे. असंगाशी संग केल्यामुळे त्यांना चांगले निर्णय घेताना काही सुचत नाही. आम्ही मंदिरांसमोर शांतीचा संदेश घेवून आज बसलो तरी पुढील वेळी आम्ही प्रत्यक्ष दर्शनाला जावू हिंमत असेल तर आडवा''असे आव्हान आज आळंदीत महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस श्रीकांत भारती यांनी राज्य सरकारला दिले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक क

आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर महाद्वारात राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत भाजपाच्यावतीने लाक्षणिक उपोषण केले. ''मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार'' असे म्हणत राज्य सरकारच्या विरोधात भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीने टीका केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे संयोजक संजय घुंडरे, भाजपा शहराध्यक्ष किरण येळवंडे, अॅड आकाश जोशी, अशोक उमरगेकर, पुरूषोत्तम पाटील, गोविंद गोरे, पांडूरंग शितोळे, संग्राम भंडारे, धर्मेंद्र खांडरे, गुलाब खांडेभराड, पूजा शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

भारती म्हणाले, ''मंदिर उघडणे हा राजकिय विषय नाही. मंदिरामध्ये लाखो लोकांची श्रद्धा आणि निष्ठेचा विषय आहे. सावत्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात कोविड सेंटरवरील मुलींवर बलात्कार होतात. मंदिरे पहिल्या दिवशी उघडली असती तर, ही स्थिती राज्यात आली नसती. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे परिवर्तनाचा केंद्रबिंदू असून ते सध्या दार लावून आत बसलेत. मंदिराचे दार उघडले नाही तर राज्यात सामाजिक परिवर्तन होणार नाही. वारकऱ्यांच्या भावना आणि मंदिर उघड्याचा विषय याबाबत सुबुद्धी या क्षणापर्यंत दुर्दैवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. सरकारे येतील जातील. आमचा जेनेटीक विरोधी पक्षाचा आहे. संघर्ष आमच्या रक्तात आहे. पण तुम्ही असंगाशी संग केला. एकवेळा राज्यातील माउलीचे दार उघडून बघा, शेतकऱयांचे कल्याण होईल. पक्षीय राजकारण सोडा. राज्याच्या भल्यासाठी वारकरी संप्रदायाच्या किर्तनकारांनी केवळ यापुढे बघ्याची भूमिका न घेता मंदिरे सुरू करा. मंदिरे वेळीच उघडली नाहीत तर, या दुष्ट सरकारचे परिमार्जन करावे लागेल. सरकारला आव्हान आहे की मैदानात उतरण्याची वेळ येवू देवू नका.''

क्षमता १२०० प्रवाशांची अन्‌ प्रवास केला फक्त १५ प्रवाशांनी
 

''आम्हाला माउलींचे दर्शन घेवू द्या. तुमची श्रद्दा आहे की, नाही माहिती नाही. आमची श्रद्धा विज्ञानाच्या पलिकडे आहे. राज्यातील मंदिराची कवाडे उघडी करा. कोरोनाच्या संकटावर मात करण्याची ताकद-उर्जा मंदिरातून मिळते. वाईट वाटते ठाकरेंचा सुपूत्र राजसिंहावर बसल्यावरही तेव्हा अपेक्षा की मदिरानंतर आणि मंदिर पहिले उघडतील. मात्र तसे झाले नाही.''


अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या दुसऱ्या दिवशी ऑफलाइन सुरळीत पण, ऑनलाइन अडखळत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT