harshwardhan patil Sakal
पुणे

भाजपच्या विश्वासावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याने देशात वाढता जनाधार - हर्षवर्धन पाटील

देशातील ५ राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४ राज्ये जिंकून दैदिप्य मान ऐतिहासिक यश संपादन केले.

डॉ. संदेश शहा

देशातील ५ राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४ राज्ये जिंकून दैदिप्य मान ऐतिहासिक यश संपादन केले.

इंदापूर - देशातील ५ राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) भाजपने (BJP) ४ राज्ये जिंकून दैदिप्य मान ऐतिहासिक यश (Success) संपादन केले. जनतेने भाजपावरती असलेल्या विश्वासावर (Trust) शिक्कामोर्तब करून भाजपा कारभाराची पोचपावती दिली आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री. पाटील पुढे म्हणाले, उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्यासह उत्तराखंड, मणिपूर, गोवा राज्यात भाजपला जनतेने एकतर्फी कौल देत पुन्हा सत्ता दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष डॉ. जे. पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावरती व भाजपच्या ध्येय धोरणावर जनतेने पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वसामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून ''सबका साथ सबका विकास'' या सूत्रानुसार भाजपने सत्ता राबविल्याने हे यश मिळाले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारख्या विकासाभिमुख व निवडणूक झालेल्या राज्यातील भाजपा सरकारच्या लोकहिताच्या योजनांमुळे फक्त भाजपाच आपला विकास करू शकते हे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जगात दबदबा असल्याचे रशिया-युक्रेन युद्धादरम्यान सिद्ध झाले असून, त्यामुळे जनता मोदींच्या नेतृत्वा खाली केंद्र सरकारवर खूश आहे. राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जनाधार वाढत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आपण गोव्यात प्रचार केल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Municipal Corporation Election : महापालिकेत यंदा कोणाला संधी? काँग्रेसला १३ वेळा महापौरपदाचा मान; शिवसेनेला एकदाच मिळाली संधी

Mumbai Election Campaign : प्रचारासाठी गर्दीचा भाव वधारला! तासाभराच्या घोषणांसाठी मोजावे लागतायत १,००० रुपये!

'सुरज कुठे गेला?' बिग बॉसच्या रियुनियन पार्टीला सुरजला बोलवलं नाही? पाचही सीझनचे स्पर्धेक उपस्थित पण...

Ajit Pawar Rally Chaos : मिरजेत अजित पवारांच्या सभेत गोंधळ; उमेदवारावर तडीपारीच्या कारवाईने समर्थक संतापले

यांचं नक्की काय चाललय! आधी चप्पल, आता मसाला चहा परफ्युम? PRADAने लाँच केला ‘चहा-सुगंधी’ परफ्युम; किंमत ऐकून तर वेडेच व्हाल

SCROLL FOR NEXT