Chandrakant_Patil 
पुणे

'...त्यांची व्यवस्था आम्ही करू'; चंद्रकांत पाटील यांनी कुणासाठी केली घोषणा?

सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : कोरोनाची लक्षणे दिसत नसलेल्या पण घरी क्वॉरंटाईन होण्यास अडचण असलेल्या ज्या नागरिकांची शिफारस महानगरपालिका करेल, अशा नागरिकांच्या पाच दिवस निवास आणि भोजनाची व्यवस्था आम्ही विनामूल्य करू. त्यासाठी शंभर खोल्यांचे हॉटेल आरक्षित केल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

किष्किंधानगर या कंटेनमेंट परिसरात प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करताना पाटील बोलत होते. पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेविका छाया मारणे, डॉ. संदीप बुटाला, पुनीत जोशी, माजी नगरसेवक दिलीप उंबरकर, अजय मारणे, अनिता तलाठी, सुरेखा जगताप, अॅड. रुपेश भोसले, रणजित हगवणे आदी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कोवीड केअर सेंटर नावाने सुरु करत असलेल्या या हॉटेलात ज्यांची घरे लहान आहेत, अशा रुग्णांना राहण्याची सोय होईल. पुण्यामध्ये २५ जुलैपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता राहील. त्यानंतर मात्र ही संख्या कमी होत जाईल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंटेन्मेंट परिसरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीच्या गोळ्या वाटप केल्या असल्या तरी सोशल डिस्टन्सिंग राखण्यास सर्वचजण विसरल्याचे चित्र दिसत होते. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना गोळ्या वाटण्यासारखे हे सार्वजनिक कार्यक्रम कोरोनाविरुद्धच्या सराकारी लढ्यात अडथळा तर ठरत नाही ना? याचे आत्मपरिक्षण राजकीय नेत्यांनी करणे आवश्यक आहे. फक्त भाजपच नव्हे, तर इतर राजकीय पक्ष आयोजित करत असलेल्या कार्यक्रमातही असेच घडत असल्याने सर्वांनी खबरदारी घ्यावी, अशी भावना कोथरुडमधील सुजाण नागरीक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

मालमत्ता ४ कोटींची, मग १३ कोटींची रोल्स रॉयस कुठून आली? मैथिली ठाकूरच्या व्हिडीओवरून CAचा सवाल, चौकशीची मागणी

Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

Lohara Crime : पतीने धारदार शस्त्राने वार करून पत्नीचा केला खून; हल्ल्यानंतर पतीने स्वतःवर वार करून पोलिस ठाण्यात झाला हजर

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT