saswad
saswad  
पुणे

आचार्य अत्रे यांच्या जन्मघरी नीलफलकाचे अनावरण

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्मदिन आज पुरंदर तालुक्यातील सासवड येथे साजरा करण्यात आला. या निमित्त कऱ्हा नदीकाठी असलेल्या जन्मघरी व वाघिरे विद्यालयात नीलफलकाचे अनावरण करण्यात आले.

सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने विजय कोलते यांनी आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमास साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश खाडे, कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, माजी नगराध्यक्ष हेमंत भोंगळे, आर. एन. जगताप, कार्यकारिणी सदस्य अॅड. कला फडतरे, कुंडलिक मेमाणे, प्रा. हनुमंत चाचर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संचालक बाबा शिंदे, मुख्याध्यापक रामदास शिंदे, बंडुकाका जगताप, भानुदास जगताप, बाळासाहेब दाभाडे, प्रशांत खळदकर, वसंत ताकवले, बाळासाहेब मुळीक, दशरथ कामथे, रवींद्र पोमण, राहुल जाधव, दादा मुळीक, शांताराम कोलते आदी उपस्थित होते. 

यानिमित्त बाबा शिंदे यांनी सांगितले की, सासवड शहरातील आचार्य अत्रे यांच्या शाळेत एका सभागृहालाही अत्रे यांचे नाव दिले जाईल. कोलते म्हणाले की, आचार्य अत्रे यांचे पोस्टाचे तिकीट काढण्याचा प्रस्ताव पोस्ट खात्याकडे सादर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT