BMCC_Pune 
पुणे

विद्यार्थ्यांनो, 'बीएमसीसी' कॉलेजनं सुरू केलाय नवीन कोर्स; वाचा काय आहे या नव्या कोर्समध्ये?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रोजगार म्हटले की, 'कौशल्य विकास' हा शब्द ओघानेच येतोच, ती काळाची गरजही आहे. हे महत्त्व ओळखून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने (बीएमसीसी) यंदापासून कौशल्य विकासावर आधारित 'बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज' (बीएमएस) (ई-कॉमर्स ऑपरेशन्स) हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये शेवटच्या वर्षात उद्योग समूहामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे 'बीएमसीसी' हे पहिलेच महाविद्यालय आहे. या अभ्यासक्रमात कौशल्यविकास आणि वाणिज्य शाखांवर आधारित प्रत्येकी १५ विषय आणि व्यवस्थापन शाखेवर आधारित ३ विषयांचा समावेश असेल, या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योग, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी सांगितले. 

अभ्यासक्रमासाठी बीएमसीसीने लॉजिस्टिक सेक्‍टर स्किल कौन्सिलसोबत (एलएसएससी) सामंजस्य करार केला आहे. त्याद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिपची व्यवस्था करता येणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने स्किल इंडिया कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत एलएसएससीची स्थापना केली होती. प्रवेशासाठी सर्व माहिती आणि नमुना अर्ज महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सागर फडके यांनी सांगितले. डॉ. वर्षा देशपांडे या अभ्यासक्रमाच्या समन्वयिका आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT