death 
पुणे

दोन दिवस खूर्चीवरच होता मृतदेह; दौंडमधील सोनाराचा दुर्दैवी मृत्यू

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरातील जुने सोनार सतीश आंबुडकर यांचा मृतदेह दोन दिवस घरातील खूर्चीवरच असल्याची बाब समोर आली आहे. शेजाऱ्यांनी दार वाजवून देखील प्रतिसाद न दिल्याने कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघड झाला. दौंड पोलिस ठाण्याचे हवालदार मारूती हिरवे यांनी याबाबत माहिती दिली. सोनार असलेले सतीश आनंदराज आंबुडकर ( वय ७८, रा. वृंदावन अपार्टमेंट, नेने चाळ, दौंड ) यांचे भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुकान होते परंतु वार्धक्यामुळे त्यांनी ते बंद केले होते.

त्यांच्या पत्नी मागील चार महिन्यांपासून औषधोपचारासाठी मोहोळ (जि. सोलापूर) येथे राहत असल्याने ते नेने चाळीतील सदनिकेत एकटेच राहत होते. सतीश आंबुडकर यांचा सदनिकेचा दरवाजा दोन दिवसापासून आतून बंद असल्याने व ते प्रतिसाद देत नसल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. ५ एप्रिल रोजी दुपारी त्यांच्या पत्नी लतिका दौंड येथे नातेवाईकासह आल्यावर सतीश आंबुडकर हे खूर्चीवर मृतावस्थेत आढळले. दुर्गंधी पसरल्याने पोलिसांनीच त्यांचा मृतदेह उचलून विच्छेदनासाठी रवाना केला. दौंड पोलिस ठाण्यात या बाबत लतिका सतीश आंबुडकर (वय ७० ) यांनी दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT