Doctor
Doctor 
पुणे

बोगस डॉक्‍टरांचा सुळसुळाट

पीतांबर लोहार

पिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा जाहिरातींद्वारे रुग्णांना फसवणाऱ्या बोगस डॉक्‍टरांच्या बनवेगिरीला अनेक जण बळी पडत आहेत. मात्र, फसवणुकीनंतरही बदनामी अथवा प्रतिष्ठेमुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास कुणीही तयार नाही व तक्रार असल्याशिवाय कारवाई करणार नाही, अशी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाची भूमिका असल्यामुळे बोगस डॉक्‍टरांना मोकळे रान मिळाले आहे. 

बनवेगिरी अन्‌ वास्तव
आमच्याकडील औषधे आयुर्वेदिक आहेत. त्याचा कोणताही साइड इफेक्‍ट होत नाही. दुसऱ्या औषधांमुळे उष्णतेचा त्रास होऊन आणखी रक्तस्राव होईल, आमच्या औषधांमुळे काहीही त्रास होणार नाही, असे सांगून रुग्ण व नातेवाइकांचा विश्‍वास संपादन केला जातो. रुग्णावर उपचार केला जातो. त्याला थोडे बरे वाटते. मात्र, पुन्हा त्रास सुरू होतो. याचा गंभीर अनुभव नुकताच चिखलीतील एका प्रतिष्ठित घराण्यातील तरुणाला आला. अशा एका बोगस डॉक्‍टरकडे तो तरुण मूळव्याधीवरील उपचारासाठी गेला. गावठी उपचार करून तरुणाला घरी जाऊ दिले. मात्र, त्याच रात्री गुद्‌द्‌वारातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने त्याला चिंचवड येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. तिथे शस्त्रक्रिया केल्यानंतर एक महिन्यांनी घरी सोडले. दोन लाखांवर खर्च झाला.

बोगस डॉक्‍टरविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्‍टरांनी दिला. त्यावर, ‘गावठी उपचार घेतले, ही आमची चूक झाली. पण, तक्रार दिली तर, आमच्या घराण्याची बदनामी होईल,’ असे उत्तर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी दिले.

‘निमा’चा निष्कर्ष
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (निमा) पिंपरी-चिंचवड शाखेने केलेल्या पाहणीनुसार, शहर परिसरात शंभरावर बोगस डॉक्‍टर आहेत. ‘निमा’चे वाकड-हिंजवडी, चिंचवडगाव-चिंचवड स्टेशन, निगडी-चिखली, भोसरी-आळंदी, सांगवी, पिंपळे निलख-पिंपळे सौदागर, असे विभाग केलेले आहेत. प्रत्येक विभागात १० ते १५ बोगस डॉक्‍टर असल्याचा त्यांचा निष्कर्ष आहे. ‘निमा’चे शहर सचिव डॉ. अभय तांबिले म्हणाले, ‘‘बदललेली जीवनशैली, चुकीच्या पद्धतीचा आहार यामुळे मलावरोध होऊन मूळव्याधीसारखे विकार वाढत आहेत. आपल्याकडे त्याचे प्रमाण शंभर रुग्णांमागे दहा, असे आहे.’

रुग्णांनी फसव्या जाहिरातींना बळी पडू नये. तज्ज्ञ डॉक्‍टरांकडूनच उपचार करावेत. बोगस डॉक्‍टरांविरुद्ध महापालिकेतर्फे कायद्यानुसार कारवाई केली जाते. नागरिकांनी रीतसर तक्रारी केल्यास संबंधित बोगस डॉक्‍टरांवर कारवाई करता येईल. 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT