Bopdev ghat rape case accused sakal
पुणे

बोपदेव अत्याचार प्रकरण! मुख्य आरोपीबाबत मोठी माहिती समोर, पोलीस कठोर कारवाई करण्याच्या तयारीत

Bopdev Ghat Case: बोपदेव अत्याचार प्रकरण मोठी बातमी समोर आली आहे. मुख्य आरोपीवर याआधीही गुन्हे दाखल आहेत.

Vrushal Karmarkar

बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अख्तर बाबू शेखच्या विषयीची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अख्तर बाबू शेखवर आधीही सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. सामूहिक बलात्काराबरोबरच अख्तर बाबू शेखच्या विरोधात ॲट्रॉसिटी, दरोडा आणि विनयभंगाचेही गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भिगवण पोलीस ठाण्यात अख्तर शेखच्या विरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. जुलै 2019 मध्ये अख्तर शेख च्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अख्तर शेख आणि त्याच्या दोन साथीदारांना अटकही झाली होती. ⁠भिगवण येथील गुन्ह्यातही अख्तर शेखची मोडस ऑपरंडी बोपदेव घाटातील गुन्ह्याप्रमाणेच आहे.

भिगवणमध्ये काय घडलं होतं?

⁠भिगवण परिसरात रात्री दुचाकीवरून आपल्या पतीबरोबर चाललेल्या महिलेला अख्तर शेख आणि त्याच्या साथीदारांनी धडक देऊन पाडले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत सदर महिलेवर शेख आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला. या महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवत झाडाला बांधून ठेवून महिलेवर बलात्कार केला होता. ⁠याप्रकरणी शेख आणि त्याच्या साथीदारांवर बलात्कार ॲट्रॉसिटी आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या पोलीस ठाण्यातही आत्तर शेख याच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

याआधी शेख आणि त्याच्या साथीदारांनी २०१९ मध्ये दरोडा टाकला होता. ⁠पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यातही शेखच्या विरोधात या आधीचा एक गुन्हा दाखल आहे. शेखच्या विरोधात याआधीचा कोंढवा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. ⁠बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणी शेखवर चौथा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे शेख आणि त्याच्या साथीदारांवर पुणे पोलीस मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

LPG import updates: 'एलपीजी'बाबत सरकारने प्लॅन बदलला! अमेरिकेसोबत मोठा निर्णय, गॅसचं संकट टळणार

Pune Heavy Rain : पावसाने दाणादाण! जनजीवन विस्कळित, घरांसह दुकानांमध्ये शिरले पाणी

Davadi News : रेटवडी येथील तरुण ओढ्यात दुचाकीसह वाहून बेपत्ता

विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाचा निधी संपला! विद्यापीठ शासनाला पाठविणार सुधारित अंदाजपत्रक; पुतळ्याचे तोंड उत्तरेकडे नको, पूर्वकडे करण्याची नवी मागणी

SCROLL FOR NEXT