boy sits in boiling water social media viral video explanation 
पुणे

Social Viral:उकळत्या पाण्यात बसला मुलगा; फेसबुकवर फसवेगिरीचा भांडाफोड

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सोशल मीडियावर कधी काय शेअर होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर कढईत उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलेल्या मुलाचा व्हिडिओ शेअर होतोय. जणू चमत्कार असल्यासारखं त्याच्या भोवती भाविकांचा गराडा आहे. या प्रकाराची पोलखोल करणारी एक पोस्ट सध्या फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे. 

फेसबुकवर अंधश्रद्धा निर्मुलन समिताचे महाराष्ट्र सरचिटणीस शहाजी भोसले यांनी उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलेल्या मुलाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केलाय. मुळात सोशल मीडियावर शेअर होणारा हा व्हिडिओ कुठं शूट करण्यात आलाय. याची मात्र माहिती कोणालाही नाही. पण, अशी फसवणूक कोणाचीही होऊ शकते. त्यामुळं प्रत्येकजण दुसऱ्याला जागरूक करू लागलाय. भोसले यांनी व्हिडिओ शेअर करताना त्याच्याबरोबरच मराठीत या प्रकाराचं स्पष्टीकरण देणारी पोस्टही शेअर केलीय. दोन स्वतंत्र कढईच्या माध्यमातून ही फसवेगिरी होते, असं शहाजी भोसले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. मुलगा बसलेली कढई आणि धग असलेली कढई यांच्यात थोडा गॅप असतो. बसलेल्या कढईत पाण्याला उकळताना येतात तसे बुडबुडे आणण्यासाठी हवेची एक पाईप जोडलेली असते. पाण्यात फुलं टाकलेली असतात त्या फुलांच्या गर्दीत ती पाईप दिसत नाही. पाणी उकळत असल्याचं दिसत असल्यामुळं कोणी त्यात हात घालून बघत नाही आणि हवेचे बुडबुडे आलेल्या पाण्याला उकळी येत असल्याचं सगळे मान्य करतात.

नेटकऱ्यांनी मानले आभार
शहाजी भोसले यांनी आकृतीसह या फसवेगिरीचा भांडाफोड केल्यामुळं फेसबुकवर अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत. अनेकांनी हा प्रयोग कुठं करण्यात आलाय, याची माहिती विचारली आहे. काहींचा अशा प्रकारावर विश्वास असल्याचं दिसत आहे. त्यामुळं त्यांनी शहाजी भोसले यांच्या स्पष्टीकरणाला आक्षेप घेतलाय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

2026 ठरू शकते सर्वात उष्ण वर्ष, संयुक्त राष्ट्रांच्या हवामान संघटनेचा इशारा; एल निनोमुळे तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा

पहिल्या सभेला महायुतीचे १२ संचालक गैरहजर का राहिले? धनंजय महाडिकांनी सांगितलं कारण, अध्यक्षपदाच्या फॉर्म्युल्यावरही बोलले

Latest Marathi News Live Update: अमरावतीत कोटींच्या ठकबाजीत भारसाकळे कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ

अंगावर व्हाईट कोट अन् मनात टीम इंडियाची जर्सी! सरकारी डॉक्टरची नोकरी सोडून क्रिकेट खेळणारी पंढरपुरातील वेदिका मगर कोण?

फडणवीसांनी वटारलं तर तुमचं साम्राज्य एक दिवसात उद्ध्वस्त होईल, चंद्रकांतदादांचा सतेज पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT