khadakwasla canal
khadakwasla canal sakal
पुणे

खडकवासला कालव्यात पोहण्यासाठी गेलेला मुलगा बुडाला

निलेश बोरुडे

खडकवासला धरणापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला तेरा वर्षांचा मुलगा बुडाला.

किरकटवाडी - खडकवासला धरणापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला तेरा वर्षांचा मुलगा बुडाला असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे जवान व हवेली पोलीसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मयुर बापु मरगळे (वय-13, रा. गल्ली नं 8, शिवनगर, किरकटवाडी) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मयुर त्याच्या मित्रासह पोहण्यासाठी गेला होता. त्याला अजून नीट पोहता येत नव्हते. धरणापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या लोखंडी पुलाजळ मयुर पाण्यात उतरला व पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. घाबरलेल्या मयुरच्या मित्राने ही माहिती मयुरच्या आजोबांना सांगितली व त्यानंतर हवेली पोलीस ठाण्याला ही माहिती देण्यात आली.

सहाय्यक फौजदार सुभाष गिरे यांनी तात्काळ नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती दिली. अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश मायनाळे, शुभम मिरगुंडे, श्रीकांत आढाव, शरद माने, पंकज माळी, अक्षय काळे व अभिषेक गोणे हे जवान आणि पोलीस नाईक विश्वास मोरे हे मयुरचा शोध घेत आहेत.

उन्हाळी आवर्तन सुरू असल्याने पाण्याला वेग

सध्या खडकवासला धरणाच्या कालव्यातून हवेली, दौंड व इंदापूर या भागातील शेतीसाठी 1134 क्युसेकने उन्हाळी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे कालव्यातून वेगाने पाणी वाहत आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्य करण्यात अडथळा निर्माण होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT