विद्यानगर - सुमती भानुदास राजदेरकर लिखीत ब्रेल लिपीतील गाण्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.
विद्यानगर - सुमती भानुदास राजदेरकर लिखीत ब्रेल लिपीतील गाण्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर. 
पुणे

ब्रेल लिपीतील बालगीतांच्या पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने निवडक बालगीतांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यानगर येथील निवांत अंध मुक्तालयाच्या वतीने सुमती भानुदास राजदेरकर संग्रहित या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. या पुस्तकाचे प्रकाशन एस.बी.आय. लाइफचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष आनंद पेजावर यांच्या हस्ते झाले.

छोट्या बच्चेकंपनीसाठी असलेले हे पुस्तक निवांत संस्थेच्या वतीने ब्रेल लिपीमध्ये तयार केले आहे. कार्यक्रमाच्या सुरवातीला आनंद बडवे यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. 

अंध विद्यार्थ्यांसाठी स्वलेखन ॲपचा उपयोग व्हावा म्हणून पेजावर यांनी एस.बी.आय. लाइफच्या वतीने ४ लाख ४६ हजार २५० रुपयांची मदत केली. याद्वारे ७५ मोबाईल खरेदी करण्यात येणार आहेत. गुंतवणूकतज्ज्ञ सुहास राजदेरकर म्हणाले, ‘‘प्रत्येक दिव्यांग व्यक्तीमध्ये एकतरी मोठा कलागुण असतो, जो त्यांनी ओळखून व प्रयत्नपूर्वक जोपासून लोकांसमोर आणला पाहिजे.’

या वेळी कोथरूड आणि भोसरी येथील अंध मुलांसाठी असलेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी, तसेच त्यांच्या संगीत शिक्षकांनी पुस्तकांमधील निवडक गाणी सादर केली. याप्रसंगी लेखिका सुधा मेनन, सुहासिनी राजदेरकर, प्रकाश बक्षी, ज्योती बक्षी, विवेक राजदेरकर, ‘निवांत’चे शंभराहून अधिक आजी व माजी विद्यार्थी, तसेच एस.बी.आय. लाइफचे वरिष्ठ अधिकारी दीपक गायकवाड, हेमलता घाडीगावकर, मारूथी नायडू आदी उपस्थित होते. आभार उमा बडवे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT