SNBP International School 
पुणे

एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल - देदीप्यमान यशाची परंपरा

सकाळवृत्तसेवा

‘एसएनबीपी’ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स ही शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. के. भोसले आणि वैद्यकीय व्यावसायिक असलेले आणि डॉ. वृषाली भोसले यांच्या विचारांतून निर्माण झालेली संस्था आहे. दोन दशकांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा असलेली आणि उत्कटता आणि सर्वोच्च गुणवत्तेशी कटिबद्धतेने प्रेरित असलेली ही संस्था आहे. ‘एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ ही केजी ते पीजी पर्यंतच्या शिक्षणाच्या सोयींनीयुक्त असलेली अनेकपटींनी वाढ झालेली संस्था आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विस्तारलेल्या संस्थेच्या पाचही शाखांना संचालिका देवयानी भोसले आणि ऋतुजा भोसले या नव्या पिढीचे अद्ययावत आणि उच्च तंत्रज्ञानाचे प्रशासन लाभलेले आहे. वैभवशाली यशाचे कृपाछत्र लाभलेल्या या संस्थेत विविध समाजघटकांच्या गरजेनुसार राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई आणि केंब्रिज अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा आहे. सुमारे पंधरा हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कला, वाणिज्य, शास्त्र आणि कायदा अशा शिक्षणाच्या विविध शाखा विकसित झाल्या आहेत. संस्थेतील पदवीपूर्व अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पूर्तता करण्यासाठी, शाळांचे लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवनात अनेक उपक्रम राबविण्याकडे आहे. यात मार्शल आर्टस्‌, योग, पोहणे, वॉल क्‍लाईबिंग, मल्लखांब, स्केटिंग, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल इत्यादींचा समावेश आहे. याबरोबरच ब्रेट ली, ख्रिस गेल, रोहित शर्मा, गगन नारंग, धनराज पिल्ले, संदिप सिंग, युवराज वाल्मिकी, धनंजय महाडिक यांसारख्या क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी संस्थेला दिलेल्या भेटी त्याची साक्ष आहेत. या शाळांमध्ये संगीत विषयाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात शाळेने राष्ट्रीय स्तरावरील बॅन्ड स्पर्धा जिंकली. एहसान नूरानी आणि ग्रेग एलिस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत भेट दिली. संस्थेत विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

‘एसएनबीपी''चा अभ्यासक्रमांवर प्रमुख भर आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई आणि एसएससी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये ‘एसएनबीपी’ स्कूलच्या सर्व शाखांचा निकालामध्ये चमकदार कामगिरी दाखवली आहे. ‘सीबीएसई’ परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे संस्थेच्या शिक्षकवृंदाने किती कष्ट घेतले असतील, याची कल्पना येते.

वाघोली, चिखली, रहाटणी, मोरवाडी आणि येरवडा येथील शाळा या अत्युत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक डिझाईन (रचना) असलेल्या आहेत. संस्थेच्या संस्थापकांची दूरदृष्टी विचारात घेऊन संस्थेच्या सर्व शाखांमध्ये काळजीपूर्वक निवडलेला गुणवत्तापूर्ण कर्मचारीवर्ग आहे.

कोणताही अडथळा न येता तंत्रज्ञान आत्मसात केलेले शिक्षक ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. याद्वारे त्यांची वैभवशाली संस्थेबद्दलची वचनबद्धता आणि शिकवण्याबद्दलची उत्सुकता दिसून येते.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे विस्थापित झालेल्या कामगारांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पंतप्रधान मदत निधीला दहा लाख रुपयांची देणगी दिली आहे. या शैक्षणिक वर्षासाठी शाळा, ११वी कॉमर्स, सायन्स आणि लॉ कोर्सेसच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे.

शाळेसाठी संपर्क -
मोरवाडी शाखा ७०३०९४१७४३, ७७७४०५९६३२
रहाटणी शाखा ७७७०००३८२३/२४, ७७६७००८६५२
चिखली शाखा ७७७४०५९६३८ / ४०
येरवडा शाखा ०२०-२६६८६१६२, २६६१२३०६
वाघोली शाखा ७७६८००७९२४ / ९६०७९८३४८१.

अकरावी आणि बारावीच्या प्रवेशासाठी संपर्क -
पिंपरी - ७७७४०५९६४९
रहाटणी - ७७७४०५९६३५
चिखली- ९१६८६२८६०२

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 32 तासांनंतर पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर; प्रवाशांचे हाल

‘वाराणसी’मुळे सिनेविश्वात उत्सुकतेची लाट; राजामौली, महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांचा खास खुलासा

तुंबळ हाणामारीत युवकाचा खून; भाऊबंदकीचा वाद शिगेला पोहोचला, तीन जण गंभीर, अहिल्यानगर जिल्ह्यातील थरारक घटना..

Pune Mumbai Expressway Traffic Jam : वाहतूक, उद्योग क्षेत्राचे नुकसान; दैनंदिन पुरवठ्यासाठी नेल्या जाणाऱ्या बऱ्याच मालाची नासाडी

श्रीरामपूरात भाजपचा पालिकेत ठिय्या, तलावामध्ये मैला, दुर्गंधी सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल, दोषींवर कठोर कारवाई करा!

SCROLL FOR NEXT