school 
पुणे

Breaking: शाळा-महाविद्यालये सुरु करण्याबाबत मोठा निर्णय

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  पुण्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. अभ्यासिका 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  तसेच रात्रीचे संचार निर्बंधही कायम असणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत रविवारी (ता. २८) निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शाळा-महाविद्यालये आणखी १५ दिवस बंद ठेवण्याबाबत प्रशासनाचे एकमत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने नुकताच घेतला होता. त्याची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. तथापि शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू करण्याबाबत नेमका काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून होते.. 

विद्यार्थ्यांना अनामत रक्कम परत करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना आदेश

कोरोनाच्या नवीन लाटेत संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी "आयसर' आणि "टीसीएस' या दोन संस्थांकडून अभ्यास सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली. शाळा-महाविद्यालये आणखी १५ दिवस बंद ठेवावीत, अशी चर्चा यावेळी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT